

पुढारी ऑनलाईन: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लर्क पदाची मोठी भरती निघाली असून, यासाठी आजपासून अर्ज करण्याची प्रकिया ही आजपासून (दि. ७ सप्टेंबर) सुरू होत आहे. SBI Clerk या पदासाठी तब्बल ५ हजारांहून अधिक जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी SBI ची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अर्ज भरण्याची प्रक्रिया करता येणार आहे. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी या वेबसाईटवरील सूचना काळजीपूर्वक वाचावी, असेही या सांगण्यात आले आहे.
SBI लिपिक पदाची जाहिरात ही ६ सप्टेंबरला प्रसिद्ध झाली असून, या पदभरतीची प्रक्रिया ही अधिकृत वेबसाईटवर ७ स्पटेंबरपासून सुरू होणार आहे. तर २७ सप्टेंबर ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे. या पदासाठी अर्ज करताना ओपनमधील उमेदवारांसाठी 750 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. एससी, एसटी, ओबीसी आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.
असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, सीनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह, मॅनेजर, सेंट्रल ऑपरेशन टीम, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर, सीनियर रिलेशनशिप मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर, रिजनल हेड, कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह, मॅनेजर आणि सिस्टम ऑफिसर या पदासाठीही SBI ने भरती सुरू केली आहे. यासाठी २० सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे.