सोनाली फोगाट खून प्रकरण : दोघांच्या पोलिस कोठडीत वाढ | पुढारी

सोनाली फोगाट खून प्रकरण : दोघांच्या पोलिस कोठडीत वाढ

म्हापसा/हणजूण ः पुढारी वृत्तसेवा भाजप नेत्या आणि टिकटॉक अभिनेत्री सोनाली फोगाट खून प्रकरणातील अटकेत असलेले संशयित आरोपी सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग यांची पोलिस कोठडी मंगळवारी आणखी दोन दिवसांनी वाढवली आहे. दुसरीकडे या दोघांना न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी मागणी दोघांच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली होती ती नाकारली.

या दोघांचा कोठडीची मुदत मंगळवारी संपली होती. ती म्हापसा जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांनी वाढवली. या खून प्रकरणात दोघे मुख्य संशयित आहेत. सांगवान याने मालमत्ता हडप करण्यासाठी खून केल्याची कबुली यापूर्वीच दिलेली आहे.

23 ऑगस्ट रोजी उत्तर गोव्यातील हणजूण येथील सेंट अँथनी रुग्णालयात सोनाली (42) यांना मृत घोषित केले होते. पोलिसांनी तपास सुरू केला होता. सोनालीचा भाऊ रिंकू ढाका याने वरील दोन आरोपींविरुद्ध हणजूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी सोनालीचे स्वीय सहायक सुधीर आणि मित्र सुखविंदर यांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी कर्लीस बार अ‍ॅण्ड
रेस्टॉरंटचे मालक एडविन नुनीस, अमली पदार्थ विकणारा रामा मांद्रेकर आणि तो…

पंतप्रधानाकडे ट्विटरद्वारे साकडे

सोनाली फोगाट यांची मुलगी यशोधराने मंगळवारी प्रकरणी सीबीआय तपासाची मागणी पुन्हा केली. यावेळी तिने ट्विटरच्या माध्यमातून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आईच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली आहे

अन्य संशयितांच्या जामिनावर आज निवाडा शक्य

या प्रकरणी अटकेत असलेले व सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले कर्लिस बार अ‍ॅण्ड रेस्टॉरेंटचे केअर टेकर एडविन नुनीस, रूमबॉय तथा ड्रग्ज पेडलर दत्तप्रसाद गावकर व दुसरा ड्रग्ज पेडलर रामदास मांद्रेकर या तिघांची पोलिस कोठडी पुन्हा मिळावी यासाठी पोलिसांनी केलेल्या अर्जावर तसेच एडविन नुनीस याच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी घेण्यात
आली.

एडविन नुनीस यांच्या वतीने अ‍ॅड. सुरेंद्र देसाई यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्हींचा निकाल दि.7 रोजी राखून ठेवला आहे. दुसर्‍या प्रकरणात आसगाव येथील एलन डिसोझा यांच्या संशायस्पद मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या शिरीष गोवेकर, प्रमोद उर्फ बाबू खोर्जुवेकर या दोघांना दुसर्‍यांदा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना आणखी
तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Back to top button