Bank New Rules : १ तारखेपासून बँकांच्या नियमांमध्ये बदल जाणून घ्या

१ फेब्रुवारीपासून बँकांमध्ये नवे बदल होणार आहेत.
१ फेब्रुवारीपासून बँकांमध्ये नवे बदल होणार आहेत.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्कः भारताचा २०२२ चा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२२ ला जाहीर होणार आहे. या अर्थसंकल्पात सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार की नाही यावर येणारा अर्थसंकल्प ठरवेल. दरम्यान सामान्यांशी जवळीक असलेल्या गोष्टींमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पामुळे बँका, घरगुती गॅस याचबरोबर अन्यबाबींच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. (Bank New Rules)

Bank New Rules : Bank of Baroda च्या नियमांमध्ये हे होणार बदल

यंदाचा अर्थसंकल्प १ तारखेला सादर झाल्यानंतर Baroda बँकेच्या नियमांमध्ये किरकोळ बदल करण्यात आला आहे. हे नियम चेक क्लिअरन्स संदर्भात असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे. 1 फेब्रुवारीपासून चेक पेमेंटसाठी दिल्यानंतर ग्राहक पॉझिटिव्ह पे अशी माहिती जोपर्यंत देत नाही तोपर्यंत चेक क्लेअर होणार नसल्याचा बदल करण्यात आला आहे. याचबरोबर नियमातील हा बदल 10 लाख रुपयांवरील चेक क्लिअरन्ससाठी असणार आहे.

State Bank of India कडून व्यवहारांच्या मर्यादेत वाढ

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, आपल्याला तात्काळ एखाद्याला पैसे द्यायचे असतील तर आपल्या खिशाला आता कात्री लागणार आहे. बँकेकडून तात्काळ पेमेंट सेवेसाठी (Immediate Payment Service) २ लाख ते ५ लाख रुपयांदरम्यान रक्कम ट्रान्सफर केल्यास २० रुपये + जीएसटी शुल्क आकारला जाणार असल्याचा नियम लागू होणार आहे.

आरबीआयने तात्काळ पेमेंट सेवेच्या माध्यमातून होणाऱ्या ट्रान्झॅक्शनची मर्यादा वाढवली होती. त्यामुळे ग्राहक आता एका दिवसात २ लाखांऐवजी ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करू शकतात.

Bank New Rules : तर पंजाब नॅशनल बँक दंड वसूल करणार

देशातील कित्येक लोक आपली खात्यावर रक्कम ठेवत नसतात यापुर्वी बँका यासाठी दंड लावत असत. परंतु हा दंड आता वाढणार आहे पंजाब नॅशनल बँकेकडून १ तारखेपासून १०० ऐवजी आता खात्यात रक्कम नसलेल्या ग्राहकांना २५० रुपये दंड मोजावा लागणार आहे. यामुळे ज्यांच्या खात्यावर पुरेसी रक्कम नाही त्यांना खात्यावर पुरेसी रक्कम ठेवावी लागणार आहे, अन्यथा अतिरिक्त दंडाला सामोरे जावे लागणार आहे.

LPG गॅसच्या दरात कपात होणार?

मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे ग्राहकांना LPG वर मिळणारी सबसीडी सरकारने बंद केल्याने ग्राहकांना अतिरिक्त दराने घरगुती गॅसला रक्कम मोजावी लागत होती. महिन्याच्या १ तारखेला गॅस दरात बदल होत असतात.

दरम्यान बजेट दिवशी ग्राहकांना गॅसबाबत दिलासा मिळणार की खिशाला कात्री लागणार याबाबत शक्यता वर्तवण्यात येत आहे. १ फेब्रुवारीला निर्मला सितारमन यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करतील. तेव्हा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आकारल्या जाणार्या करांमध्ये काय बदल होतील हेही पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही वाचलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news