शिक्षक भरती घोटाळ्यात आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक | पुढारी

शिक्षक भरती घोटाळ्यात आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे. प्रशासकीय सेवेत एवढ्या बड्या मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

२०१९ डिसेंबर २०२० कालावधीत खोडवेकर हे शिक्षण विभागात कार्यरत होते. त्यांनी सावरीकर यांच्याकडून पैसे घेतले असल्याचे तपासात समोर आल्यानंतर खोडवेकर यांना अटक करण्यात आली आहे. खोडवेकर हे २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या खोडवेकर हे कृषी विभागात उपसचिव म्हणून कार्यरत आहेत.

शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक केली होती.

त्यावेळी खोडवेकर हे शिक्षण विभागात कार्यरत होते. सावरीकर याच्या सोबत खोडवेकर याचा आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले. त्यानंतर खोडवेकर यांना अटक करण्यात आली आहे.

Back to top button