Rohit Sharma : ‘या’ खेळाडूने रोहितची तुलना केली धोनीशी | पुढारी

Rohit Sharma : ‘या’ खेळाडूने रोहितची तुलना केली धोनीशी

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेस्टइंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी ( Darren Sammy ) वाटतं की, रोहित शर्माच्या (Rohit Sharma)  नेतृत्वाखाली भारतीय संघ सुरक्षित आहे. तसेच रोहितकडे खेळाडुंकडून सर्वोत्तम कागगिरी करुन घेण्याची क्षमता आहे. या बाबतीत रोहित शर्माची भारताचा यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्याशी तुलना होऊ शकते. अशापद्धतीने पाच वेळा आयपीएल कप जिंकणाऱ्या रोहित शर्मा याची तुलना थेट महेंद्रसिंग धोनी यांच्याशी डॅरेन सॅमीने केली आहे.

आगामी वेस्टइंडिज विरुद्धच्या ( India vs West Indies ) मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पुर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. ६ फेब्रुवारी पासून वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका सुरु आहे. वेस्ट इंडिज भारत दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि तीन टी २० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिका रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळली जाणार आहे. विराट कोहली याने आता सर्वप्रकाराच्या क्रिकेट मधील कर्णधार पदावरुन राजीनामा दिला आहे. त्यामुळे या पुढे एकदिवसीय आणि टी २० सामन्यांमध्ये रोहित शर्मा कर्णधार असणार आहे. बीसीसीआयने अद्याप कसोटीसंघाच्या कर्णधार पदाची घोषणा केली नसली तरी ही जबाबदारी देखिल रोहित शर्माकडेच येईल असे मानले जात आहे.

डॅरेन सॅमीने रोहितचे (Rohit Sharma) कौतुक करत पुढे म्हणाला, ‘ विराट कोहलीचे (Virat Kohli) मैदानावरील पदर्शन सर्वश्रेष्ठच असायचे, पण आता विराट कोहली पायउतार झाल्याचा परिणाम संघावर होणार नाही. रोहित शर्मा याने मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) उत्कृष्टपणे कर्णधारपद सांभाळले आहे. तो नेहमी प्रेरणादायी कर्णधार राहिला आहे. मी आयपीलमध्ये त्याची कामगिरी पाहिले. तो नेहमी विजय मिळवून देणार करणाधार राहिला आहे. एमएस धोनी प्रमाणेच त्याची कामगिरी राहिली आहे.’

भारतात खेळल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्ध भारत या मालिके संदर्भात सॅमी म्हणाला, की वेस्ट इंडिज संघाला चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. केरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखालीली वेस्ट इंडिजचा संघ उत्तम आहे. पोलार्डला भारतात खेळण्याचा चांगला अनुभव आहे. तसेच संघातील इतर खेळाडू आपीएलमध्ये भाग घेतात त्यामुळे त्यांना देखिल भारतातील परिस्थितीची चांगली माहिती आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज संघ भारताला चांगली टक्कर देऊ शकेल. आपीएल खेळण्याचा अनुभवाचा वेस्ट इंडिज संघाने फायदा उठवावा.

भारत स्वत:च्या भूमीत अधिक मजबूत राहिला आहे. पण, सध्या आफ्रिका दौऱ्यामध्ये मोठ्या पराभवास सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे संघातील खेळाडुंचे मनोबल कमी झाले आहे. त्यातच संघाला नवा कर्णधार मिळाला आहे. पण, तो देखिल नुकताच मोठ्या दुखापतीतून बाहेर आला आहे. सध्या भारताचा संघ एका संक्रमन अवस्थेतून जात आहे. भारतीय संघाच्या या अस्थिरतेचा लाभ वेस्ट इंडिज संघ निश्चित घेऊ शकेल, असे मत डॅरेन सॅमीने व्यक्त केले.

 

Back to top button