bhagyashree mote engaged : भाग्यश्रीचा सुंदर हिरव्या साडीत साखरपुडा

bhagyshree mote -vijay palande
bhagyshree mote -vijay palande
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिलीय. तिचा साखरपुडा पार पडलाय. या सुंदर क्षणांचे अनेक फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. तिने या फोटोंना कॅप्शन देत म्हटलंय-'मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत जीवनाची नवीन क्षितिजे आखत आहे! तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा असाव्यात!? #engaged'. विजय पलांडे असं तिच्या होणाऱ्या पतीचं नाव असून तो एक मेकअप डिझायनर आहे.

भाग्यश्री सोबतच विजयनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. विजयने शेअर केलेल्या फोटोंना Celebrating Us!❤️ अशी कॅप्शन दिलीय. तर आणखी एका फोटोला हार्ट इमोजी शेअर करून ❤️ #Engaged असं लिहिलं आहे. खास म्हणजे विजयच्या फोटोंना बॉलिवूड अभिनेता ऋितिक रोशनने Beautiful ❤️ god bless ! अशी कमेंट केलीय.

भाग्यश्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या जात आहेत. एका युजरने लिहिलंय- साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास तर छान होतोच पण तुमच्या प्रवासाचा साक्षीदार असलेला हा दिवस अविस्मरणीय राहो ? माझ प्रेम ,साथ आणि आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत आणि राहतील. दुसऱ्या युजरने लिहिलंय- सर्वसामान्य कुटुंबातील असून देखील खूप मोठी झालीस मनपूर्वक शुभेच्छा भावी जीवनासाठी❤️. आणखी एका युजरने लिहिलंय-Congartulation dear??

भाग्यश्रीने आणखी काही फोटो अपलोड केले आहेत. या फोटोंना तिने शुभारंभ!? #family #extendedfamily अशी कॅप्शन लिहिलीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Palande (@vjypalande)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Palande (@vjypalande)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news