बेळगाव पुढारी वृत्तसेवा: तीन वर्षांपूर्वी झालेल्या खून प्रकरणी तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बाराव्या जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. जन्मठेप झालेल्यामध्ये मनोजकुमार मल्लाप्पा वालीकार, जोतिबा शंकर रवळोजी व मंजुनाथ ईराप्पा कल्लोळी (सर्व रा. गोकाक) यांचा समावेश आहे.
15 एप्रिल 2019 रोजी जगदीश तिप्पाण्णा कराळी (वय 35, मूळ रा. नेसरगी, सध्या गोकाक) याचा खून केला होता. पुरावे मिटविण्यासाठी आरोपींनी मृतदेह घटप्रभा कालव्यात फेकून दिला होता. घटनेची नोंद घटप्रभा पोलिस ठाण्यात नोंद झाली होती.
तत्कालीन वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली गोकाकचे तत्कालिन पोलिस निरीक्षक व्ही. एस. मुरनाळ यांनी याचा तपास करत न्यायालयाला आरोपपत्र सादर केले होते. बुधवारी सुनावणी होऊन न्यायाधीश विजयकुमार एस. आनंदशेट्टी यांनी तिघांना जन्मठेप सुनावली.
हेही वाचा