अहमदाबाद ; पुढारी ऑनलाईन : गुजरातमधील गिफ्ट सिटीत असलेल्या National Stock Exchange च्या International Financial Service Center (IFSC) येथून अमेरिकेतील ८ कंपन्यांचे शेअर्समध्ये व्यवहार करता येणार आहेत. ३ मार्चपासून ही सुविधा सुरू होत आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात अल्फाबेट, अॅमेझॉन, टेस्टा, मेटा, मायक्रोसॉफ्ट, नेटफ्लिक्स, अॅपल, वॉलमार्ट या कंपन्यांचे शेअर्समध्ये व्यवहार करता येणार आहेत.
National Stock Exchange ला अमेरिकेतील ५० कंपन्यांच्या शेअर्समध्ये व्यवहार करण्याची परवानगी मिळालेली आहे. पहिल्या टप्प्यात वरील आठ कंपन्यांत व्यवहार होतील. त्यानंतरच्या टप्प्यात उर्वरित मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये व्यवहार करता येणार आहेत. यात बर्कशायर हॅथवे, मास्टरकार्ड, जेपी मॉर्गन, नाईके, पेपाल अशा कंपन्याचा सहभाग करण्यात येणार आहे.
पण असे जरी असले तरी याचा अर्थ भारतीय शेअर बाजारात या कंपन्यांचे लिस्टिंग असणार नाही. गुंतवणूकदार शेअर्स घेतील आणि त्याचे Unsponsored depositary receipts मिळणार आहे. या सर्व व्यवहारांसाठी रेग्युलेटर म्हणून IFSC काम पाहणार आहे.
रेटेल ग्राहक IFSCच्या प्लॅटफॉर्मवर हे व्यवहार करू शकतील.
स्थानिक ग्राहकांना IFSCवर डिमॅट अकाऊंट सुरू करावे लागेल. तसेच या शेअर्सची पावती ही परकीय संपत्ती म्हणून गणली जाणार आहे.
Bombay Stock Exchange च्या Indian International Exchange ही IFSCच्या माध्यमातून परदेशी शेअर्स विकत घेण्याची सुविधा देते. यात BSEची भूमिका ही आंतरराष्ट्रीय ब्रोकरसाठी Introductory Broker ची आहे.