सिंधुदुर्ग: कार-मोटारसायकल धडकेत आंबेखोल येथील प्रौढ ठार: तरुण गंभीर

sindhudurg accident
sindhudurg accident
Published on
Updated on

देवगड (सिंधुदुर्ग) पुढारी वृत्तसेवा: कुणकेश्वर यात्रेला दर्शन घेण्यासाठी शिरगाव-आंबेखोल येथून जाणार्‍या भाविकांवर काळाने घाला घातला. लिंगडाळगाव येथे वॅगनर कारची मोटारसायकलला समोरून जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात सुधीर पांडुरंग लब्दे (51) यांचा जागीच मृत्यू झाला तर अमोल संजय लब्दे (30, दोघेही रा. शिरगाव-आंबेखोल) हा गंभीर जखमी झाला.

हा अपघात मंगळवारी रात्री 9.45 वा.सुमारास झाला.याच दिवशी लिंगडाळ गाव येथील शाळेजवळील धोकादायक वळणावर एक कार पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला 10 फुट खाली कोसळली.या अपघातात एका महिलेला किरकोळ दुखापत झाली. मात्र, गाडीचे पूर्णत: नुकसान झाले.हा अपघात दुपारी 2 वा.सुमारास झाला.

अमोल लब्दे व सुधीर लब्दे हे दोघेही मोटारसायकलने मंगळवारी रात्री कुणकेश्वर यात्रेला जात होते.रात्री 9.45 वा.सुमारास कुणकेश्वरहून कणकवलीच्या दिशेने जाणार्‍या व्हॅगनर कारने पुढे असलेल्या वाहनाला ओव्हटेक करुन भरधाव वेगाने जात असताना समोरून येणार्‍या मोटारसायकलला जोरदार धडक बसली.

यात मोटारसायकलस्वार अमोल लब्दे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली तर सुधीर लब्दे हे खाली पडल्याने डोके आपटून गंभीर दुखापत झाली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती समजताच अमित साटम, नानू लब्दे, चंद्रशेखर तावडे अपघातस्थळी तत्काळ दाखल झाले.दोघांनाही शिरगांव येथील राजे ग्रुपच्या रुग्णवाहिकेने प्रथम शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. गंभीर दुखापत झाल्यामुळे अमोल लब्दे याला शिवसेना तालुकाप्रमुख मिलींद साटम, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप साटम, उपसरपंच अमित साटम, पोलिस पाटील चंद्रशेखर साटम, प्रथमेश तावडे, मंगेश लोके आदींनी कोल्हापूर येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी वॅगनरचालक सिध्देश चंद्रकांत चव्हाण (रा.कणकवली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

कार पलटी होऊन दुसरा अपघात

दरम्यान, याचदिवशी कुणकेश्वर यात्रेसाठी जात असताना फोर्ड कार लिंगडाळ शाळेनजीक असलेल्या धोकादायक वळणावर पलटी होऊन रस्त्याच्या लगत 10 फुट खाली कोसळली.

अपघात झाल्याचे समजताच लिंगडाळ येथील ओंकार खाजणवाडकर, वैभव नारींग्रेकर, गंगाराम आईर, बाबू मुंबरकर, नितीन तोडणकर, गणेश कोठारकर आदींनी धाव घेऊन कारमधील लोकांना सुखरूप बाहेर काढले.या गाडीतील सर्व भाविक हे सावंतवाडी तालुक्यातील असल्याचे समजत.

हेहा वाचा 

1111111111111111

लिंगडाळ: दुसर्‍या अपघातात 10 फुट खाली ओहोळात कोसळेली कार (छाया:वैभव केळकर)
2 एसआय 35

मृत सुधीर लब्दे 2 एसआय 33 जखमी अमोल लब्दे 2 एसआय 34

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news