कर्नाटक : दोन दिवसांचे अर्भक रस्त्यावर; निष्ठुर जन्मदात्यांकडून माणुसकीला काळिमा फासणारी घटना

कर्नाटक : दोन दिवसांचे अर्भक रस्त्यावर; निष्ठुर जन्मदात्यांकडून माणुसकीला काळिमा फासणारी घटना
Published on
Updated on

खानापूर (कर्नाटक) : पुढारी वृत्तसेवा
अवघ्या दोन दिवसांच्या अर्भकाला रस्त्याशेजारी फेकून दिल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आला. येथील रेल्वे स्टेशन रोडवर तहसीलदार कार्यालय आणि सरकारी दवाखाना यादरम्यान झाडाखाली स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने खळबळ माजली आहे. जन्मदात्यांनीच अर्भक वार्‍यावर टाकल्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना असून पालकांच्या निष्ठुरतेबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

अडीच किलो वजनाचे बाळ तंदुरुस्त असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करून पाळणाघरात हलवण्यात आले आहे. नेहमीप्रमाणे नगरपंचायतीच्या महिला सफाई कर्मचारी रस्त्याकडेला साफसफाई करताना त्यांच्या नजरेस एक पिशवी दिसली. जवळ जाऊन पाहिल्यानंतर पिशवीत झोपलेल्या अवस्थेतील बाळ दिसून आले. तेथे उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते गोपाळ भेकणे यांनी लागलीच बाळाला सरकारी दवाखान्यात दाखल केले.
खानापूर पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. सोमवारी रात्री कोणी नसताना या बाळाला रस्त्याशेजारी सोडून गेल्याचे दिसून येते.

रात्रीपासून सकाळपर्यंत पडून राहिल्याने बाळाला ताप आला होता. खानापूर सरकारी दवाखान्यातील बालरोग तज्ज्ञ डॉ. पवन यांनी बाळावर उपचार करून शुद्धीत आणले. विशेष दक्षता विभागातील उपचारांची गरज वाटू लागल्याने रुग्णवाहिकेतून बेळगाव येथील जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले. याप्रकरणी महिला आणि बालकल्याण खात्याकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

याला काय म्हणाल?

विशेष म्हणजे या बाळाच्या पालकांनी त्याला सोडण्यासाठी जाणीपूर्वक वर्दळीची जागा निवडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाळाला पावडर लावून कापडात गुंडाळून व्यवस्थितरीत्या स्वच्छ पिशवीतून रस्त्याकडेला ठेवले गेले होते.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news