कर्नाटक : तीन लाखांचा दहा किलो गांजा जप्‍त | पुढारी

कर्नाटक : तीन लाखांचा दहा किलो गांजा जप्‍त

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
काकतीजवळ शहर गुन्हे विभागाने (सीसीबी) दोघांना पकडत त्यांच्याकडून 2 लाख 49 हजार रुपये किमतीचा 8 किलो 300 ग्रॅ्र्रम गांजा पकडला. एपीएमसी पोलिसांनी बॉक्साईट रोडवरील भारतनगरजवळ 28 हजारांचा 1 कि. 400 ग्रॅम गांजा पकडला. या दोन्ही कारवाया रविवारी सकाळी झाल्या.

सीसीबीने अटक केलेल्या संशयितांमध्ये अमन अक्रम जमादार (वय 20, ख्वाजा बस्ती, ता. मिरज, जि. सांगली) व फारूक आलमनवाज खान (वय 37,रा. मूळ रा. ख्वाजा बस्ती मिरज, सध्या रा. जुनेदनगर कुडची, ता. रायबाग) यांचा समावेश आहे. एपीएमसी पोलिसांनी नितीन सुरेश मकवानी (वय 37, बॉक्साईट रोड, साईमंदिराजवळ आंबेडकरनगर) व नईम अब्बास खोजा (वय 28, मूळ रा. टिपू सुलताननगर, गोकाक, सध्या रा. पहिला क्रॉस आसदखान सोसायटी) या संशयितांना अटक केली आहे.

अमन व फारूक हे दोघेजण महाराष्ट्रातून मिरज येथून गांजा घेऊन येत असल्याची माहिती सीसीबीचे निरीक्षक निंगनगौडा पाटील यांना मिळाली. त्यांनी सहकार्‍यांसह जाऊन काकती येथील पर्ल ढाब्याजवळ सापळा रचला. या ठिकाणी दोघे सापडले. त्यांच्याकडून 8 कि. 300 ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईल जप्त केले. हे दोघेजण महाराष्ट्रातील पंढरपूर, मिरज या परिसरातून गांजा आणत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारवाईत एच. एस. निसुन्नवर, बी. एन. बळगन्नवर, एस. एस. पाटील, एम. एम. वडेयर, एस. एम. बजंत्री, वाय. डी. नदाफ, एस. बी. पाटील यांनी भाग घेतला.

बॉक्साईट रोडवरील भारतनगर येथे नितीन व नईम हे दोघेजण गांजा विकत असल्याची माहिती एपीएमसीचे निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांना मिळाली. त्यांनी सहकार्‍यांसह जाऊन त्यांना पकडले, त्यांच्याकडून गांजा व रोख 800 रू. जप्त केले. या कारवाईत एएसआय बी. के. मीटगार, एन. वाय. मैलाकी, एस. जी. कुगटोळ्ळी, व्ही. पी. बूदनवर, एस. एस. हलगीमनी, केंपान्ना दोड्डमनी, नामदेव लमाणी यांनी भाग घेतला.

दैनिक पुढारीने दिला वृत्तपत्र विक्रेत्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वास

हेही वाचलत का ?

Back to top button