पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानच्या तहरीक-ए-इंजाफ (PTI) पक्षाने इम्रान खान यांनी पंतप्रधान पदावरून हटविल्यामुळे त्याविरोधात रविवारी रात्री अनेक शहरांमध्ये अनेक रॅली काढण्यात आली. इस्लामाबाद, कराची, पेशावर आणि लाहौरसहीत विविध शहरांमध्ये या विरोधात्मक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंदोलकांनी विरोधी पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वासाचा प्रस्तावातून पंतप्रधान पदावरून हटविण्यात आले आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात इम्रान खान यांच्या समर्थकांनी 'चोकीदार चोर है', अशा घोषणा दिल्या. येथील लाल हवेलीमध्ये हजारोंच्या संख्येने लोक जमा झालेले होते. इम्रान खान यांच्या समर्थकांनी विरोधांना लष्कराची चोकीदार आहे, असे म्हणत त्यांना चोर म्हटलं. ते म्हणाले, "इम्रान खान यांच्या जनादेशाची चोरी केलेली आहे."
इम्रान खान यांचे समर्थक करणार जेल भरो आंदोलन
व्हायरल व्हिडिओमध्ये देशाच्या लष्कराच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना माजी गृहमंत्री शेख राशिद हे अडविताना दिसत आहेत. ते म्हणाले की, "घोषणाबाजी करून नका, आपण शांततेने आंदोलन करू. जर तुम्हाला देश वाचवायचा असेल रात्रीच्या अंधारात नाही तर, दिवसाच्या उजेडात निर्णय घ्या. २९ तारखेला ईद आहे. आपण तयार राहिले पाहिजे. आपण रोज जेलभरो आंदोलन करू. मी स्वतः कराचीमधील आंदोलनाचा भाग होणार आहे. विरोधकांना सांगणार आहे की, तुम्ही धोकेबाज आणि लुटणारे आहात."
इम्रान खान यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून हटविल्यानंतर कराची शहारात रोषणाई करण्यात आली होती. इस्लामबादच्या झिरो पाॅईंटपासून विरोध सुरू झाला. पीटीआई समर्थक एकत्र झाले आणि इम्रान खान यांच्या समर्थानर्थ घोषणा देण्यात आली. पीटीआयचे प्रवक्ते फवाद चौधरी यांनीदेखील दिवसा इस्लामाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधताना नागरिकांना सांगितले की, ईशाच्या नमाजानंतर आंदोलन करा, अशी विनंती चौधरी यांनी केली होती.
हे वाचलंत का?