Asia Cup 2023 Final : फायनलमध्‍ये पावसाचा ‘खेळ’ झाल्यास कोण ठरणार विजेता?

Asia Cup 2023 Final : फायनलमध्‍ये पावसाचा ‘खेळ’ झाल्यास कोण ठरणार विजेता?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि श्रीलंका यांच्यात आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना उद्या (रविवारी) खेळवण्यात येणार आहे. इतर सामन्यांप्रमाणे या अंतिम सामन्यावरही पावसाचे ढग आहेत. रविवार, १७ सप्‍टेंबर राेजी कोलंबोमध्ये पावसाची शक्यता जास्त वर्तवण्यात आली आहे. रविवारी पावसामुळे सामन्‍यात अडथळा आल्‍यास आशिया चषक स्‍पर्धेत काेणता संघ विजयी हाेणार याबाबत जाणून घेवूया…

संबंधित बातम्या :

उद्या पावसामुळे सामन्याचा निकाला लागला नाही तर, यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ८व्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर दासुन शनाकाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा संघ विजेतेपद राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसेल. (Asia Cup 2023 Final)

फायनलवर पावसाचे ढग

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील अंतिम सामन्याच्या दिवशी पावसाची ८० टक्के शक्यता आहे. म्हणजेच सुपर-4 फेरीप्रमाणेच विजेतेपदाच्या सामन्यातही पावसाची खेळी पाहायला मिळण्‍याची शक्‍यता मिळणार आहे. अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. म्हणजे रविवारी पावसामुळे अंतिम सामना पूर्ण झाला नाही, तर सोमवारी (दि.१८) सामना खेळवण्यात येणार आहे. (Asia Cup 2023 Final)

राखीव दिवशीही पावसाने बॅटिंग केली तर विजेता कोण?

रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी कोलंबोमध्ये पाऊस पडला, तर विजेता कसा ठरणार? राखीव दिवशीही पाऊस पडला तर, स्पर्धेचे विजेतेपद दोन्ही संघांमध्ये संयुक्तपणे देण्यात येईल. नियमांनुसार, अंतिम सामन्याचा निकाल मिळविण्यासाठी, दोन्ही संघांना किमान 20-20 षटके खेळणे आवश्यक आहे.

कशी आहे कोलंबोची खेळपट्टी?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया चषक 2023 च्या विजेतेपदाचा सामना कोलंबोच्या आर, प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. कोलंबोच्या या मैदानावर फलंदाजांचे वर्चस्व आहे. चेंडू बॅटला खूप चांगला आदळतो आणि धावा काढताना फारशी अडचण येत नाही. मात्र, दुसऱ्या डावात खेळपट्टी निश्चितच थोडी मंदावते. फलंदाजांसोबतच खेळपट्टी फिरकीपटूंनाही खूप मदत हाेण्‍याची शक्‍यता आहे. त्यामुळे फलंदाजांचे टेन्शन वाढू शकते. एकूणच आशिया चषक वन-डे फायनल सामन्‍याकडे लक्ष वेधलेल्‍या क्रिकेट चाहत्‍यांच्‍या नजरा कोलंबोतील प्रेमदासा स्‍टेडियमकडे लागल्‍या आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news