Manipur Football Player : देशाला SAFF U16 चॅम्पियनशिप जिंकून देणाऱ्या मणिपूरच्या ‘बेघर’ फुटबॉलपटूची ‘कथा आणि व्यथा’ | पुढारी

Manipur Football Player : देशाला SAFF U16 चॅम्पियनशिप जिंकून देणाऱ्या मणिपूरच्या 'बेघर' फुटबॉलपटूची 'कथा आणि व्यथा'

पुढारी ऑनलाइन डेस्क : Manipur Football Player : देशासाठी खेळण्यासाठी तो गेला. त्याने नेतृत्व केले. भारतासाठी कपही जिंकला. मात्र, घरी परतल्यानंतर त्याला त्याचे घरच मिळाले नाही. त्याच्या कुटुंबियांसह तो आता मदत शिबिरात राहतो आहे. ही कथा आणि व्यथा आहे भारतासाठी खेळणाऱ्या अंडर 16 फुटबॉल टीमच्या कॅप्टनची ज्याचे घर मणिपूर हिंसाचारात जाळून टाकण्यात आले.

संबंधित बातम्या :

नगमगौहौ मेट भारतीय फुटबॉल टीम अंडर 16 चा कॅप्टन आहे. तो मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यात राहतो. त्याच्या नेतृत्वात भारतीय टीमने थिम्पू येथे दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन अंडर-16 चॅम्पियनचे (SAFF U16 CHAMPIONSHIP 2023) विजेतेपद पटकावले. जेव्हा तो खेळायला गेला होता तेव्हा मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात त्याचेही घर जाळले गेले. त्यामुळे त्याचे कुटुंबीय विस्थापित झाले.

Manipur Football Player : आई-वडिलांनी शिबिरातच केले मुलाचे स्वागत

दक्षिण एशियाई फुटबॉल फेडरेशनचे विजेतेपद पटकावून नगमगौहौ जेव्हा मणिपूरला त्याच्या गावी परतला तेव्हा त्याला त्याचे घरच मिळाले नाही. त्याला कळाले की त्याचे आई-वडील कांगपोकपी जिल्ह्यातील एका मदत शिबिरात जिथे सर्व हिंसाचारग्रस्तांना स्थलांतरीत करण्यात आले आहे तिथे राहत आहेत. तो शिबिरात पोहोचला. तिथे त्याच्या आई-वडिलांनी त्याचे स्वागत केले.

Manipur Football Player : फुटबॉल चॅम्पियनकडे घर नाही तरीही शांतीची आशा

मणिपूर हिंसाचारात आपले घर गमावल्या नंतरही या फुटबॉल चॅम्पियनने मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मेट म्हणाला, “माझ्या आजूबाजूचे लोक सुरक्षित आहेत याबद्दल मी देवाचे आभारी आहे. या मोठ्या प्रमाणावर झालेल्या हिंसाचारामुळे आमचे राज्य प्रभावित झाले आहे आणि आता मला वाटते की आपण शांततेची आशा केली पाहिजे.”

Manipur Football Player : मेट सह संघातील इतर खेळाडूंचा सन्मान

नगामगौहौ मेट आणि भारतीय संघातील इतर आदिवासी खेळाडूंचा गुरुवारी कांगपोकपी येथे सन्मानित करण्यात आले. जिथे त्यांचा उर्वरित मणिपूरसाठी संदेश होता. यावेळी वुम्लेनलाल हंगशिंग जो भारतीय अंडर-16 फुटबॉल संघाचा खेळाडू जो लेफ्ट बॅक खेळतो तो म्हणाला, “आमचे आमच्या Meitei सहकाऱ्यांवर प्रेम आहे. आम्ही मैत्रीपूर्ण आहोत आणि जसे आम्ही एकत्र ट्रॉफी जिंकल्या आहेत, त्याचप्रमाणे आम्हाला मणिपूरमध्ये शांतता हवी आहे. 23 जणांच्या संघात 15 जण मणिपूरचे आहेत.

हे ही वाचा :

Back to top button