Aryan Khan Drug Case : सुजैन खानने गायले गोडवे, ‘तो एक चांगला मुलगा’

sussanne khan
sussanne khan
Published on
Updated on

सुजैन खानने शाहरुखचा मुलगा आर्यन खानचे गोडवे गायले आहेत. 'तो एक चांगला मुलगा आहे' असे म्हणत तिने आर्यनचे समर्थन केलं आहे. सुजैन खानला या गोष्टीचं दु:ख हे की, ड्रग्सच्या आरोपाखाली शाहरुखचा मुलगा आर्यन चुकीच्या ठिकाणी चुकीच्या जागेवर पकडला गेला. तिने एनसीबीच्या कारवाईवर आपली प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, आपण शाहरुख खान आणि गौरी खानच्या सोबत आहे. आर्यन चांगला मुलगा असल्याचे म्हणत तिने म्हटले की, हे दुर्दैवीआहे की, तो चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी उपस्थित होता.

तिने प्रसिध्द लेखिका शोभा डे यांच्या एका पोस्टवर कमेंट केलीय. तिने लिहिलं की, मी हे समजते की, हे आर्यन खानसाठी नव्हतं. दुर्दैवाने तो चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होता. या परिस्थितीत आम्ही एक उदाहरण म्हणून पाहू शकतो की, कशा प्रकारे बॉलिवूडच्या लोकांना 'विच हंट' केलं जातं. हे दु:खी करणारं आहे आणि चुकीचं आहे. कारण, तो (आर्यन खान) एक चांगला मुलगा आहे…

तिने पुढे लिहिलंय- ती यावेळी शाहरुख आणि गौरीसोबत आहे. अशा परिस्थितीत जेव्हा सोशल मीडिया बॉलिवूड सेलेब्स आणि हाय सोसायटीवाले लाईफस्टाईलवर टीका करताहेत. सुजैन आणि अन्य सेलेब्स शाहरुख खानच्या परिवारासोबत येणं एकप्रकारे एकता दर्शवते. सुखात दु:खात बॉलिवूड आपल्या माणसांसाठीचं उभे राहतो.

दरम्यान, पूजा भट्ट, सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करून शाहरुखच्या परिवारप्रती आपले समर्थन दर्शवले.

मुंबईहून गोवा जात असलेल्या क्रुझमध्ये ड्रग्ज पार्टीच्या गुप्त माहितीनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तेथे छापा टाकला होता. क्रूझ शिपमध्ये एनसीबीच्या टीमने आर्यन खानसोबत त्याच्या अन्य मित्रांनाही अटक केली होती. मुंबईतील एका कोर्टाने आर्यनसहित तीन आरोपींची रिमांड ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती.

आज होणार सुनावणी

आर्यनच्या ड्रग्ज प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. त्याला आज कोर्टात नेण्यात येईल. आर्यनच वकील पुन्हा एकदा जामीनसाठी याचिका दाखल करणार आहेत.

एनसीबी म्हणतं…

चार ऑक्टोबरला एनसीबीने कोर्टात सांगितलं होतं की, आर्यन कोडवर्डमध्ये चॅटिंग करायचा. आणि हे डिकोड करण्यासाठी कस्टडी आवश्यक आहे. अनेक चॅट्सनुसार, त्याचं डीलर्ससोबत कनेक्शन आहे. चॅटमधून स्पष्ट होत आहे की, इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनदेखील झाले आहेत. आरोपींनी ड्रग्स पेडलरशी डील करण्यासाठी कोडवर्डचा वापर केला आहे. त्यासाठी समोर चौकशीसाठी कस्टडी असणं आवश्यक आहे.

हेदेखील वाचा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news