Shahrukh Khan : शाहरुखला भेटून आर्यन भावूक, गौरी घेऊन गेली बर्गर! - पुढारी

Shahrukh Khan : शाहरुखला भेटून आर्यन भावूक, गौरी घेऊन गेली बर्गर!

मुंबई; पुढारी ऑनलाईन : क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान एनसीबीच्या कोठडीत आहे. याच दरम्यान एनसीबीची परवानगी घेऊन शाहरुख खान आणि गौरी खान आर्यनला भेटले. मुलाला भेटायला जाताना गौरी खान सोबत बर्गर घेऊन गेली होती. मात्र, एनसीबीने आर्यनला बर्गर खायला देण्यास परवानगी दिली नाही. काही मिनिटांच्या या भेटीत आर्यन खान भावूक झाला होता, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

एका वृत्तानुसार, आर्यनने आपला नेजल स्प्रे घरातून मागविला होता. तो देण्याची परवानगी देण्यात आली. शाहरुख खान (Shahrukh Khan) इतका व्यस्त असतो की कधी कधी त्याला भेटण्यासाठी त्याच्या स्वतःच्या मुलाला वेळ घ्यावी लागते. मात्र, ड्रग्ज प्रकरणात मुलगा अडकल्यानंतर शाहरुखने आपले शुटिंग थांबवले आणि तो मुलाला भेटायला गेला.

दरम्यान, आर्यन शाहरुख खान, अरबाज मर्चंटसह रेव्ह पार्टीतील सर्वच संशयित आरोपी सध्या एनसीबीचा पाहुणचार घेताहेत. कुणालाही घरचे जेवण दिले जात नाही. एनसीबीनेच जेवणाची व्यवस्था केली आहे. कॉर्डिलिया क्रूझवरील रेव्ह पार्टीतून उचलून एनसीबीच्या कार्यालयात म्हणजेच ब्रिटीशकालीन एक्सचेंज बिल्डिंगमध्ये आणल्यानंतर आरोपींच्या जेवणाचे काय हा प्रश्‍न एनसीबीला सर्वात आधी सोडवावा लागला. घरच्या जेवणाची परवानगी दिली असती तर या धनाढ्य आरोपींचे चोचले पुरवले असे आरोप एनसीबीवर झाले असते.

त्यामुळे पहिल्या रात्री एनसीबीने संपर्क साधून बेलार्ड इस्टेट लगतच्या रस्त्यावरील हॉटेलमधून जेवणाची सोय केली होती. पुरीभाजी, वरणभात आणि बिर्याणीचा जेवणात समावेश होता. एनसीबीच्या कार्यालयात कॅन्टीन नाही. त्यामुळे आलेले जेवण कशात वाढायचे इथपासून सुरूवात झाली. त्यासाठी मग कागदी प्लेटस् मागवण्यात आल्या होत्या.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : नवरात्रीत या देखण्या अलंकारांनी सजते आई अंबाबाई | Navaratri Special Video| Ambabai Temple

Back to top button