Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या रायची लिपस्टिक पाहून चाहते घायाळ  | पुढारी

Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या रायची लिपस्टिक पाहून चाहते घायाळ 

मुंबई, पुढारी ऑनलाईन : अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) सध्या परदेशात फिरण्यात व्यग्र आहे. तिच्याबरोबर पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यादेखील आहे. ऐश्वर्या राय या दिवसांत ‘दुबई एक्स्पो’मध्ये सहभागी होण्यासाठी गेली आहे. दरम्यान ऐश्वर्याने स्टॅन्डअप अगेन्स्ट स्ट्रीट हॅरेसमेंट कॅम्पेनमध्ये सहभागी झाली होती.

ऐश्वर्याचा मेकअप आर्टिस्ट आदित्य शर्माने सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले. या फोटोमध्ये ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये ऐश्वर्या राय पिंक डार्क कलरची लिपस्टिकबरोबर मोकळ्या सोडलेल्या केसांमध्ये दिसत आहे. यामध्ये ऐश्वर्या रायने ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केलेला आहे.

तसेच ऐश्वर्या रायने मॅचिंग इयररिंग घालून आपला लूक अफालातून केलेला आहे. ऐश्वर्या रायचे हेअरस्टायलिस्ट जाॅर्ज सेलमनडेलेकने तिच्याबरोबर फोटो शेअर केलेले आहे. ऐश्वर्याचे हे सुंदर फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी खूप कौतुक केलेले आहे. यंगर ऐश्वर्या, अरेस्टिंग इन ब्यूटी, अशा प्रतिक्रिया तिच्या या फोटोंवर आलेल्या आहेत.

ऐश्वर्या दुबईला जाण्यापूर्वी पॅरिसमध्ये होती. तिने पॅरिस फॅशन विकमध्ये रॅम्पवाॅक केला. त्यामध्ये शुभ्र रंगाच्या गाऊनमध्ये दिसली. त्यामध्ये गुलाबी रंगाची लिपस्टिर लावलेली होती. तिच्या सध्या व्यस्ततेबद्दल बोलायचं झालं तर… ऐश्वर्या तिच्या आगामी ‘मणिरत्नम’ चित्रपटात चाहत्यांना दिसणार आहे.

या चित्रपटात ऐश्वर्या राय डबल रोलमध्ये दिसणार आहे. यापूर्वी ऐश्वर्या राय गुरू आणि रावण या चित्रपटांमध्ये दिसली होती. पॅरिसचा फॅशन विक संपल्यानंतर ऐश्वर्या राय पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या सोबत पॅरिसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भेट देताना माध्यमांसमोर दिसली.

पहा व्हिडीओ : ‘एक थी बेगम’बद्दल स्वतः अनुजा साठे सांगतेय…

हे वाचलंत का? 

Back to top button