Anger side effects : क्रोधाने ‘हे’ होतात दुष्परिणाम

Anger
Anger
Published on
Updated on

श्रीमद् भगवद्गीतेत म्हटले आहे. 'क्रोधाभवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविश्वमः । स्मृतिभ्रंशाद बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति।।' याचा अर्थ 'क्रोधामुळे अत्यंत मूढ भाव (Anger) (मुर्खपणा) निर्माण होतो आणि या मूढ भावाने स्मृतीमध्ये भ्रम निर्माण होतो. त्यामुळे बुद्धी अर्थात ज्ञानशक्तीचा नाश होतो व बुद्धिनाश झाल्यावर मनुष्य आपल्या स्थितीपासून पतित होतो, घसरतो, त्याचा सर्वनाश होतो. कोधामुळे इतकी हानी होत असते. जो मनुष्य क्रोध करतो म्हणजेच रागावतो त्याच्या शरीरावरही त्याचे विपरित परिणाम होत असतात. बाल्टिमोरच्या जॉन हॉपकिन्स हॉस्पिटलमधील कार्डियोलॉजिस्ट डॉ. इलन शोर विटस्टीन यांनी म्हटले आहे की रागाचा शरीरातील न्यूरो हार्मोनल सिस्टीमवर सर्वाधिक प्रभाव पडतो. तो अगदी 'इमर्जन्सी'च्या पातळीपर्यंतही जाऊ शकतो. दीर्घकाळ अशीच स्थिती राहिली तर मृत्यूही संभवतो. राग हा आपल्या कार्डियोव्हॅस्क्युलर सिस्टीमपासून नवस सिस्टीमपर्यंत म्हणजेच हृदयापासून ते मज्जासंस्थेपर्यंत सर्वत्र दुष्परिणाम करतो. त्याबाबतची ही माहिती….

हृदय

ब्रोकन हार्ट सिंड्रोमचे तज्ञ डॉ. बिटस्टीन यांनी म्हटले आहे की रागामुळे (Anger) धमन्या आकुंचित होतात. जर आधीच एखादा कार्डियोल आजार असेल म्हणजे बीपी किंवा हाय कोलेस्टेरॉलची समस्या असेल तर हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. रागात बीपी वाढणे, नसा आकुंचित होणे याबरोबरच रोगप्रतिकारक यंत्रणेतून काही पेशीही निसटून जातात. हे सर्व एकाच वेळी होते. त्यामुळे धमन्या ब्लॉक होतात.

निर्णयक्षमता :

रागावलेल्या (Anger) अवस्थेत मेंदू योग्य निर्णय घेऊ शकत नाही. शिका युनिव्हर्सिटीतील बिहेवियरल न्यूरो सायन्सचे प्राध्यापक डॉ. रोयसे ली यांनी सांगितले की एखाद्या विशिष्ट कारणामुळे उत्तेजित झाल्यावर मेंदू काही तरी दाखवण्यासाठीही प्रेरित होतो. त्यामुळे रागात मनुष्य अशाही गोष्टी बोलती किंवा करतो ज्या त्याला स्वतःलाही आवडत नाहीत. रागामध्ये स्मृती कमजोर होते हे गीतही सांगितले आहे) तसेच लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रीत होऊ शकत नाही.

पोटाची समस्या

भावना आणि पोटाचा जवळचा संबंध आहे. रागामुळे (Anger) गॅस्ट्रोची समस्या होऊ लागते. खाल्लेले पचत नाही आणि बद्धकोष्ठताही निर्माण होते. डॉ. एटिनजिन यांनी सांगितले की रागामुळे पोटाचे स्नायू अधिक सक्रिय होतात. अनेक वेळा आतडे आपल्या जागेवरून सरकते. त्यामुळे डायरिया क शकतो. अनेक वेळा रागामुळे पोटात मुरडही येते व भूक लागणेही बंद होते.

उपाय :

बेल स्कूल ऑफ मेडिसीनमधील क्लिनिकल मनोवैज्ञानिक व प्राध्यापक डॉ. विल्यम बर्ग यांनी सांगितले की राग रोखणे हे नेहमीच शक्य होते असे नाही. मात्र ध्यान, प्राणायाम अशा मार्गाने आपण त्यावर नियंत्रण मिळवू शकतो. योगासनांच्या सहाय्याने आपण स्वतःला चांगली शांत झोप घ्यावी, त्यामुळे राग (Anger) कमी होतो.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news