UIDAI link : तुमचा ‘आधार’ वाचवा… लिंक अपडेट करा | पुढारी

UIDAI link : तुमचा 'आधार' वाचवा... लिंक अपडेट करा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : दहा वर्षांपूर्वी ज्यांनी आधार कार्ड काढले आणि त्यानंतर कधीही अपडेट केले नसेल तर त्यांनी तातडीने आपली सर्व कागदपत्रे आधार केंद्राशी संपर्क साधून अपडेट करावीत, असे आवाहन युनिक आयडेंटिफिकेशन अॅथोरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) केले आहे. (UIDAI link)

आधार अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावरच गेले पाहिजे असे नाही. तुमची ओळख पटवणारा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा ऑनलाईन अपलोड करूनही आध- रचे तपशील अपडेट करता येतील किंवा जवळच्या आधार केंद्रावरही हे करता येईल. यूआयडीएआयने म्हटले आहे की, अकराशेहून अधिक सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड लागते. त्यात ३१९ योजना केंद्र सरकारच्या आहेत. याशिवाय आपल्या ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी बँका व इतर वित्तीय संस्थादेखील आधारचेच कार्ड प्रमाण मानतात. त्यामुळे आधारधारकांनी लवकरात लवकर आपले कार्ड अपडेट करावे, असा सल्ला यूआयडीएआयने दिला आहे. आयकरचाही इशारा प्राप्तिकर विभागाचा कायम खाते क्रमांक (पॅन) हा पुढील वर्षाच्या मार्चअखेरपर्यंत आधारशी जोडला गेला नाही, तर तो निष्क्रिय करण्यात येईल, असा इशारा प्राप्तिकर विभागाने शनिवारी दिला.

UIDAI link : पॅन क्रमांक आधारशी लिंक करणे अनिवार्य

१९६१च्या आयकर कायद्यानुसार, सर्व पॅनधारकांनी येत्या दि. ३१ मार्च २०२३ पूर्वी आपला पॅन क्रमांक आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. दि. १ एप्रिल २०२३ पासून लिंक न झालेले पॅन कार्ड निष्क्रिय होईल, असे प्राप्तिकर विभागाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) ३० मार्च रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, एकदा पॅन निष्क्रिय झाल्यानंतर संबंधित व्यक्ती प्राप्तिकर कायद्यांतर्गत सर्व परिणामांना जबाबदार असेल आणि तिला अनेक परिणाम भोगावे लागतील. अशी व्यक्ती आयटी रिटर्न भरू शकणार नाही; तसेच तिच्या प्रलंबित परताव्यांचाही प्रश्न निर्माण होईल. कारण प्रलंबित परतावा निष्क्रिय पॅनवर जारी केला जाऊ शकत नाही. एकदा पॅन निष्क्रिय झाले, की या व्यक्तींना उच्च दराने कर भरावा लागणार आहे.

हेही वाचा 

Back to top button