Rahul Gandhi criticizes : देशात अंबानी-अदानींचे सरकार; राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींवर टीका | पुढारी

Rahul Gandhi criticizes : देशात अंबानी-अदानींचे सरकार; राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींवर टीका

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा
भारतात तयार झालेली उत्पादने जगभरात पोहोचायला हवीत. हातातील मोबाईल, कपडे, बुटांवर मेड इन चायना नव्हे तर मेड इन इंडिया असायला हवे, देशात माध्यमांत फक्त हिंदू-मुस्लिम वादावर चर्चा घडवून आणली जाते. देशातील सामान्य नागरिक एकमेकांवर प्रेम करतात. देशातील ९० टक्के लोक जात, प्रांत, धर्म या बाबी सोडून एकमेकांवर प्रेम करतात. (Rahul Gandhi criticizes)

देशातील प्रमुख मुद्दयांवरून लक्ष विचलित व्हावे म्हणून हिंदू-मुस्लिम संघर्ष दाखवला जातो. हे नरेंद्र मोदी यांचे नव्हे तर अंबानी आणि अदानी यांचे सरकार आहे, असे जोरदार टीकास्त्र राहुल गांधी जाहीर सभेला संबोधित करताना केला. तसेच त्यांनी भारत-चीन संघर्षावरही भाष्य केले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते कमल हसन उपस्थित होते.राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा शनिवारी दिल्लीत पोहोचली. कन्याकुमारीहून सुरू झालेल्या या यात्रेने १०७ दिवसांत तीन हजार किलोमीटर अंतर पार केले आहे. दिल्लीत आल्यानंतर यात्रेत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी सामील झाल्या. राहुल गांधी म्हणाले, भाजप आणि संघाने देशात द्वेषाची दुकाने खोलून राजकरण करत असल्याचे मी देशवासीयांना सांगितले आहे.

Rahul Gandhi criticizes : ९ दिवसांचा ब्रेक घेतल्यानंतर यात्रेला पुन्हा सुरुवात

आम्ही केवळ प्रेमाचा प्रसार करत आहोत. सर्व भारतीयांना आम्ही आलिंगन देतो. यात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने एकमेकांना मदत केली आहे. आम्ही श्रीमंत, गरीब आणि जातीधर्मावर कधीच भेदभाव केला नाही. यात्रेत केवळ प्रेम आणि प्रेमच पाहायला मिळाले. दरम्यान यात्रा दिल्लीत आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. त्यामुळे ट्रॅफिक जाम झाल्याने पोलिसांना गाड्या अन्यत्र वळवण्यात आले. शनिवारी २३ किलोमीटरचे अंतर पार करत सायंकाळी चार वाजता यात्रा लाल किल्ल्यावर समाप्त करण्यात आली. यानंतर ९ दिवसांचा ब्रेक घेतल्यानंतर यात्रेला पुन्हा सुरुवात होणार आहे.

हेही वाचा

Back to top button