Qutab Minar : कुतुब मीनारवर मालकी हक्क सांगणा-याची याचिका फेटाळली! | पुढारी

Qutab Minar : कुतुब मीनारवर मालकी हक्क सांगणा-याची याचिका फेटाळली!

पुढारी ऑनलाइन डेस्क : Qutab Minar : कुतुब मीनारवर स्वतःचा मालकी हक्क सांगणा-या दावेदाराची याचिका दिल्लीतील एका न्यायालयाने फेटाळली. तसेच साकेत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची समीक्षा करण्यास नकार दिला. कुतुब मीनार हे भारतातील एक ऐतिहासिक वारसा असलेली जगप्रसिद्ध वास्तू आहे. हे दिल्लीत स्थित असून येथे शेकडो पर्यटक दररोज भेट देतात.

कुवर महेंद्र ध्वज प्रताप सिंह द्वारा ही याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत सिंह यांनी दावा केला होता की ते तत्कालीन संयुक्त प्रांत आगराच्या तत्कालीन शासकाचे उत्तराधिकारी आहेत आणि कुतुब मीनार सहित दिल्ली आणि जवळपासच्या अनेक शहरांमधील जमीनीचे ते मालक आहेत.

Qutab Minar : सिंह यांनी यापूर्वी दिल्लीतील साकेत न्यायालयात याचिका दाखल केली होती. साकेत न्यायालयाने 20 सप्टेंबरला त्यांची याचिका फेटाळली होती. साकेत न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी दिल्लीतील अन्य न्यायालयात साकेत न्यायालयाच्या निर्णयाची समीक्षा व्हावी अशी याचिका त्यांनी दाखल केली होती.

दिल्लीतील न्यायालयाने याचिकाकर्ताच्या समीक्षेच्या अर्जावर अपील करण्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही, असे शनिवारी म्हटले आहे.

यासोबतच सिंह यांनी असा युक्तिवाद केला होता की कुतुब मीनार परिसरात आतमध्ये एक मंदिर आहे, असा दावा करणा-या याचिकाकर्त्यामधील ते एक आवश्यक पक्ष आहे. मंदिराच्या याचिकेत हिंदू आणि जैन देवतांच्या प्रतिमांची पुन्हा डागडुजी करून बहाल करण्याची मागणी करण्यात आली.

Qutab Minar : अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश दिनेश कुमारने म्हटले आहे की याचिकाकर्त्याने समीक्षेसाठी कोणताही भक्कम आधार दाखवू शकले नाही. यासाठी त्यांची याचिका फेटाळली.

हे ही वाचा :

पुणे : ख्रिसमसनिमित्त आज धूम, घराघरांत आनंदोत्सव; चर्चमध्ये कॅरल गीते

Morocco FIFA World Cup : मोरोक्कोने जिंकली सर्वांची मने; बक्षिसाची रक्कम केली दान

Back to top button