Latest

कर्नाटकात वीजदरवाढीचा शॉक; इंधन, गॅस दरवाढीनंतर आणखी एक धक्‍का

अनुराधा कोरवी

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅसनंतर आता वीज दरवाढ करण्यात आली आहे. आधीच महागाईने त्रस्त असणार्‍या जनतेला आता वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने सोमवारी प्रति युनिट सरासरी 35 पैसे दरवाढीची घोषणा केली. ही दरवाढ 1 एप्रिलपासूनच लागू झाली आहे.

हेस्कॉमसह राज्यातील पाच वीज वितरण कंपन्यांनी विजेच्या दरात प्रतियुनिट 1.85 पैसे वाढ करण्याची मागणी केली होती. याबाबतचा प्रस्ताव गत वर्षअखेर वीज नियामक आयोगाकडे पाठवण्यात आला होता. त्यावर आयोगाने आक्षेप मागवले होते. विविध क्षेत्रांतील लोकांची बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर प्रति युनिट 35 पैसे दरवाढीची घोषणा केली.

इंधन दरवाढ व इतर कारणांमुळे वीज पुरवठा करण्यास अधिक खर्च येत आहे. हा अतिरिक्‍त खर्च भरून काढण्यासाठी दरवाढ अनिवार्य असल्याचे वीज वितरण कंपन्यांनी आयोगाला कळवले होते. पण, मांडलेल्या प्रस्तावाप्रमाणे दरवाढ शक्य नसून सरासरी प्रति युनिट 35 पैसे वाढ करणे शक्य असल्याचे आयोगाने कंपन्यांना कळवले होते. त्यानुसार दरवाढ जाहीर करण्यात आली.

गतवर्षीही वीज कंपन्यांनी प्रति युनिट 1.39 रुपये दरवाढीची मागणी आयोगाकडे केली होती. पण, आयोगाने प्रति युनिट 30 पैसे वाढ केली होती.

4.33 टक्के दरवाढ

वीज वितरण कंपन्यांनी प्रति युनिट 5 पैसे इंधन शुल्क आणि प्रति एच.पी./कि.वॉ./के.व्ही.साठी 10 रुपयांवरून 30 रुपये वाढ करण्याची मागणी केली होती. त्याला वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली. त्यामुळे प्रति युनिट सरासरी 35 पैसे वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत 4.33 टक्के इतकी ही दरवाढ आहे.

सरासरी 35 रुपये वाढणार

एक मध्यमर्गीय कुटुंब महिन्याकाठी सरासरी 100 युनिट वीज वापरते. आजच्या दरवाढीनुसार महिन्याच्या बिलात 35 रुपयांची भर पडेल. उन्हाळ्यात विजेचा वापर वाढतो. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यांत ग्राहकांना अधिक बिल भरावे लागणार आहे. त्याशिवाय नव्या दरवाढीत औद्योगिक वीज वापराबाबतची माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT