राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर नाशिकमध्ये भोंग्याद्वारे हनुमान चालीसा | पुढारी

राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर नाशिकमध्ये भोंग्याद्वारे हनुमान चालीसा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर सभेत केलेल्या आवाहनानुसार मनसेतर्फे येथील भद्रकाली परिसरातील भद्रकाली मंदिर येथे सोमवारी (दि. 4) पहाटे भोंग्याद्वारे हनुमान चालीसा सादर करण्यात आली.

मराठी नववर्षानिमित्त शिवाजी पार्क येथे झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी प्रार्थनास्थळावरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करीत त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. याबाबत दखल न घेतल्यास त्याच प्रार्थनास्थळांसमोर हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला होता. राज ठाकरे यांच्या या इशार्‍यानुसार मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी काही पुरोहितांसह भोंग्याद्वारे हनुमान चालीसा पठण करीत ठाकरे यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार आपण नियमानुसार कृती केल्याचा दावा पवार यांनी केला आहे.

अन्य मनसैनिकांची मात्र पाठ..
नाशिकमधील इतर मनसैनिक तसेच पदाधिकार्‍यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता, अनेकांनी घटनास्थळी उपस्थित राहणेही पसंत केले नाही. मनसेची ओळख आधीपासून खळ्ळखट्याक आणि आक्रमक अशी आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर हनुमान चालीसा म्हणण्यास मोठी गर्दी होणे अपेक्षित होते. परंतु, तसे काही चित्र दिसले नाही.

हेही वाचा :

Back to top button