पुढारी ऑनलाईन डेस्क: रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोन यांच्या नात्यात लपून काहीच राहिलं नव्हतं. त्यांच्या चाहत्यांनी या जोडीला डोकीवर घेतले मात्र, रणबीर कपूर ने नुकतेच दीपिकाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आणि त्याला ट्रोल केले जात आहे.
माणसाच्या आयुष्यात प्रेमासारखं सुंदर काही नसतं. मात्र, कधी कधी हे सर्वांनाच मिळते असे नाही. मात्र, न मिळालेल्या प्रेमाबाबत सन्मान ठेवणे हेसुद्धा प्रेमाचाच भाग आहे.
एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्यावरच प्रेम म्हणजे नक्की काय याची जाणीव होते.
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण हे जोडपंही असंच प्रेमात पडलं आणि त्यांनी एकमेकांवर तुफान प्रेम केले.
पुढे त्यांच्या नात्यात कटुता आली आणि दीपिका कपूर घराण्याची सून झालीच नाही.
त्यानंतर तिने रणवीर सिंहशी विवाह केला. हे जोडपे सध्या बॉलिवूडमध्ये हॉट जोडपे म्हणून प्रसिद्ध आहे.
दीपिकाने आपल्या भूतकाळाबद्दल फारसे कधी बोलल्याचे ऐकिवात नाही. मात्र, रणबीर कपूरने वारंवार दीपिकाबद्दल वक्तव्ये केली आहेत.
नात्यांमध्ये दोन व्यक्तींनी एकमेकांचा आदर केला पाहिजे तरच ते नाते टिकते. मात्र, याचा विसर रणबीर कपूरला पडलेला दिसतो.
त्याने एक्स गर्लफ्रेंड दीपिकाबाबत केलेलं वक्तव्य ऐकून अनेकांना राग अनावर झाला.
रणबीर कपूरने नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात दीपिकाबाबत बोलताना रणबीर कपूरची जीभ घसरली. कदाचित त्याला म्हणायचे होते वेगळे आणि बोलला वेगळे.
तो म्हणाला, 'दीपिका माझ्या आयुष्यामधील महत्त्वाचा भाग होती. ती माझ्यासाठी वरण-भातासारखीच होती.
तुम्ही बाहेर जाऊन बर्गर, सँडविच, पिझ्झा खाता आणि घरी आल्यानंतर तुम्हाला वरण-भातच खावा लागतो आणि तोच चांगला लागतो. तसेच माझे होते.
दीपिका माझ्यासाठी अशीच होती. .ती माझ्यासाठी वरणभात होती.'
रणबीर कपूरचे हे वक्तव्य ऐकूण कुणालाही राग येणे सहाजिक आहे. रणबीरचे हे वक्तव्य म्हणजे पुरषी अहंकारातून आले आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले.
दीपिकासारख्या गुणी अभिनेत्रीबाबत असे वक्तव्य करणे चुकीचे आहे, असेही चाहत्यांचे म्हणणे आहे.
शिवाय आपण काय बोलतो याचे भानही रणबीरने ठेवायला हवे असेही सुनावले आहे.
घरामध्येच महिला जोडीदाराची भरभरुन स्तुती केली जाते. पण सगळ्यांसमोर जोडीदाराबाबत बोलण्याची संधी मिळते तेव्हा संयम पाळणे गरजेचे असते.
अशा वेळी पुरषी अहंकार जागृत होतो. असेच काहींसे रणबीरचे झाले आहे.
हेही वाचा
पहा व्हिडिओ: त्या दगडांचा आवाज आत्ताही माझ्या कानात आहे.