यवत/पाटस; पुढारी वृत्तसेवा : पुणे- सोलापूर महामार्गावर एसटी बस लुटीची घटना घडली होती. एसटी बस मधील लुटमार प्रकरणी एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आल्याचे समजते.
यातील तीन आरोपी हे पुणे जिल्ह्यातील आहेत, तर एक आरोपी सातारा जिल्हयातील आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर दि. 3 रोजी एसटी बस अडवून १ कोटी १२ लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता.
यातील संशयीत आरोपी हे पोलीस गणवेशात आले असल्याने त्यांचा शोध घेणे हेच पोलिसां समोर मोठे आव्हाण होते.
पुणे ग्रामीण अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करत होते.
या दरम्यान त्यांना काही महत्वाच्या धागे दोऱ्यांमुळे संशयीत आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आले असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
ही चोरी करण्यासाठी साधारणपणे दीड महिन्यांपासून हे आरोपी नियोजन करत असताना ते पाळत ठेऊन असल्याचे समजते.