mahesh bhupati 
Latest

ब्रेकपॉईंट: लिएंडर पेस आणि महेश भूपतीचे आकर्षक पोस्टर रिलीज

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : ब्रेकपॉईंट ही आगामी सीरीज आहे. टेनिस हिरो लिएंडर पेस आणि महेश भूपती यांच्या चर्चांना आणि तर्कवितर्कांना पूर्णविराम लागणार आहे. कारण, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत, ती गोष्ट आता समोर आलीय. लिएंडर पेस आणि महेश भूपति यांच्या ब्रोमॅन्सपासून ब्रेकअपपर्यंतची सर्व उत्तरे समोर येणार आहेत.

सर्व प्रश्नांची उत्तरे झी-5 च्या आगामी वेब-सीरीजमध्ये मिळणार आहेत. दोन सर्वात प्रशंसित खेळाडूंच्या मैत्री, बंधुता, भागीदारी, विश्वास, कठोर मेहनत आणि महत्वाकांक्षांवर आधारित सीरीज आहे.

ही जोडी १९९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय जोडगोळी राहिली आहे. १९९९ मध्ये जगातील सर्वोच्च स्थानावर ही जोडी राहिली होती. मात्र, हे त्यांच्या कडवट ब्रेकअपवर देखील प्रकाश टाकते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही दोन मित्रांची कहाणी आहे. ज्यांनी, यशाची योजना बनवली होती.

सीरीजचे पोस्टर रिलीज

ब्रेकपॉईंटचे पोस्टर रिलीज झाले आहे. या दोन पोस्टर्समध्ये लिएंडर आणि महेश यांना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

चित्रपट निर्माता अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी यांच्या बॅनर अंतर्गत सीरीज रिलीज होतेय. अर्थस्काय पिक्चर्सद्वारे 'ब्रेकपॉइंट' सादर करण्यात येत आहे. सात भागांची ही श्रृंखला लवकरच झी 5 वर उपलब्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT