पुणे; पुढारी वृत्तसेवा : क्रिकेट खेळताना झालेल्या भांडणातून चौघांनी एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने हल्ला केला. बोपोडी येथील भाऊ पाटील रस्ता परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी एका १७ वर्षीय मुलाने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी गणेश उर्फ घुल्या राजू शेट्टी (वय २६, रा. बोपोडी) आणि अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पुणे येथील बापोडी परिसरात संशयित आरोपी आणि फिर्यादी मुलामध्ये काही दिवसांपूर्वी क्रिकेट खेळताना वाद झाला होता.
फिर्यादी मुलगा २७ जुलैला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भाऊ पाटील रस्त्यावरील आयटी पार्कसमोर एका हातगाडीजवळ थांबला होता. त्यावेळी चौघे आरोपी तेथे आले.
त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने आणि हाताने मारहाण केली. खडकी पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.
हे ही वाचलंत का?