मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं आज निधन झालं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. सुरेखा दीर्घकाळापासून आजारी होत्या. त्या 75 वर्षांच्या होत्या. कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचं निधन झाले.
अधिक वाचा :
तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार…
सुरेखा सिकरी यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सुरेखा यांनी 'बधाई हो' आणि 'बालिका वधू' टीव्ही मालिकेमध्ये काम केले आहे.
सुरेखा यांनी चित्रपट आणि मालिकांमधून केलेल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली. त्यांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यातून त्या बऱ्या झाल्या होत्या.
आज शुक्रवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले.
तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
सुरेखा सिकरी यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथून अभिनयाचे शिक्षण घेतले. त्यांना 'तमस', 'मम्मो' आणि 'बधाई हो' चित्रपटासाठी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१९८९ मध्ये सुरेखा यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. टीव्ही मालिका 'बालिका वधू'मध्ये त्यांनी दादी सा नावाचे पात्र साकारले होते. या मालिकेतून त्या घराघरात पोहोचल्या.
अधिक वाचा :
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण…
सुरेखा सिकरी यांचा जन्म १९ एप्रिल १९४५ मध्ये दिल्लीमध्ये झाला होता. त्यांचे बालपण अल्मोडा आणि नैनीतालमध्ये गेले. त्यांनी १९७१ मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथून पदवी घेतली.
सुरेखा यांचे वडील एअरफोर्समध्ये होते. तर त्यांच्या आई शिक्षिका होत्या. सुरेखा यांचे लग्न हेमंत रेगे यांच्याशी झाले. त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव राहुल सिकरी असे आहे.
तब्बल पाच दशके अभिनयाने गाजवली…
सुरेखा यांनी तब्बल पाच दशके आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
किस्सा कुर्सी का, तमस, सलीम लंगडे पे मत रो, मम्मो, नसीम, सरदारी बेगम, सरफरोश, दिल्लगी, हरी भरी, जुबैदा, काली सलवार, रघू रोमियो, रेनकोट, तुमसा नहीं देखा, हमको दिवाना कर गए, बधाई हो, शीर कोरमा आणि घोस्ट स्टोरीज सारख्या चित्रपटांत दमदार भूमिका केल्या.
अधिक वाचा :
'बालिका वधू'मधून घराघरात पोहोचल्या…
चित्रपटांशिवाय सुरेखा यांनी बालिका वधू, एक था राजा एक थी रानी, परदेस में है मेरा दिल, सात फेरे, बनेगी अपनी बात, कसर, कहना है कुछ मुझको, जस्ट मोहब्बत सारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले.
हे ही वाचा :