Afshin Ghaderzadeh 
Latest

Afshin Ghaderzadeh : गिनीज बुकात जगातील सर्वात बुटक्या व्यक्तीची नोंद

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही बिग बॉस-१६ (Big Boss-16) मध्ये तजाकिस्तानच्या अब्दु रोजिकला पाहिलं असेल. तुम्हाला वाटलं असेल की, १९ वर्षांचा अब्दु हा जगातील सर्वात व्यक्ती असेल. पण, हे खरं नाही. (Afshin Ghaderzadeh) अब्दु तर उंचीने मोठाचं म्हणावा लागेल, इतका छोटा व्यक्ती इराणमध्ये आहे. अफशीन घदरजादेह (Afshin Ghaderzadeh) असे त्याचे नाव आहे. गिनीजने हा असा व्यक्ती शोधून काढला आहे, जो जगातील सर्वात बुटका आहे.

१३ डिसेंबर, २०२२ रोजी दुबईतील संयुक्त अरब अमीरातमध्ये ६५.२४ सेमी (२ फूट १.६८ इंच) माप घेण्यात आले होते. गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स(Guinness World Records) ने घोषणा केली आहे की, इराणच्या अफशीन एस्माईल गदरजादेह मागील रेकॉर्ड असणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत ७ सेंटीमीटर कमी लहान आहे. म्हणजेच मंगळवार (१३ डिसेंबर) रोजी २० वर्षीय अफशीन एस्माइल घदरजादेह जगातील सर्वात बुटका व्यक्ती घोषित करण्यात आले.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्यानुसार, अफशीन मागील रेकॉर्ड असणाऱ्या ३६ वर्षीय एडवर्ड 'नीनो' हर्नांडेज (Edward 'Nino' Hernandez-Colombia) पेक्षा जवळपास ७ सेंटीमीटर (२.७ इंच) लहान आहे.

Afshin Ghaderzadeh

अफशीनला दुबई कार्यालयात नेण्यात आले होते. तिथे २४ तासात त्याचे तीनदा माप घेण्यात आले होते. दुबईमध्ये अफशीनने टेलर आणि सलूनमध्ये जाऊन आपला लूक चेंज करण्याचाही प्रयत्न केला. अफशीनने जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलीफाचीदेखील सैर केली.
गिनीज रिकॉर्ड बुकनुसार, अफशीनला इराणच्या पश्चिम अजरबैजान प्रांताच्या बुकान काऊंटीतील एका दूरच्या गावातून शोधण्यात आले. तो फारसी भाषेत बोलतो. अफशीनचा जन्म झाला होता, त्यावेळी त्याचे वजन ७०० ग्रॅम (१.५ पाऊंड) होते. आता तो ६.५ किलोग्रॅम (१४.३ पाउंड) झाला आहे.

अफशीनचं आयुष्य सामान्यांसारखं नाही राहिलं. त्याला आयुष्यात अनेक अडचणी आल्या. उंचीमुळे त्याला शाळेत देखील जाता आलं नाही. त्यामुळे त्याच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला. अफशीनचे वडील एस्माइल घदरजादेह म्हणाले, "त्याने शाळा का सोडली, असा प्रश्न नेहमी लोक विचारत असतात. माझ्या मुलाला शारीरिकदृष्ट्या समस्या आहे. त्याला मानसिकदृष्या समस्या नाही."

Guinness World Records declared Afshin Ghaderzadeh 20 years old as world's shortest man with the height of 65.24 cm in Dubai. He is with his parents during the press conference in Dubai. Pawan Singh / The National

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT