अमरावती : अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या महिलांची टोळी गजाआड

अमरावती : अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या महिलांची टोळी गजाआड

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : वरूड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन लैंगिक शोषण केल्याची घटना घडली. या घटनेतील आरोपी दोन महिला आणि दोन तरुण यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वरुड तालुक्यातील १६ वर्षीय मुलीचे अज्ञात आरोपीने अपहरण केल्या प्रकरणी मुलीच्या आईने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेणे सुरू केले. ही मुलगी सविता सोनकुसरे हिने पळून नेली असावी अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सविता सोनकुसरे या महिलेला शोधून पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले. मुलीने दिलेल्या माहितीवरून तिच्यासोबत वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित केले जात होते. यामध्ये आकाश वघाळे (२७ रा. शेंदूरजनाघाट, मलकापूर), चैतन्य उर्फ पिंटु गोहत्रे (२० रा. सातणूर) या दोन आरोपींना पोलिसांनी दि. ९ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले होके. त्यानंतर त्यानंतर त्यांना जिल्हासत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात केली.

सविता सोनकुसरे (४२) या महिलेने नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा येथील वर्षा सावरकर (वय ४८) या महिलेकडे पीडित मुलीला ठेवले होते. पोलिसांनी वर्षा सावरकर व सविता सोनकुसरे या दोन्ही महिला आरोपींना ताब्यात घेऊन सोमवारी (दि. १२) जिल्हासत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात केली. या प्रकरणात एकुण चार आरोपी आहेत. या सर्वांविरूद्ध पोलिसांनी अप.क्रमांक ४३४|२०२२ कलम ३६३ , ३७६ (२) ब , ३७६ (३) भादंवि सह कलम ४,६ पोस्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरू आहे. यामध्ये अजून काही रहस्य उलगडून आरोपी वाढण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या संपूर्ण प्रकरणावर वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष ठेवून आहे. पुढील तपास ठाणेदार सतीश इंगळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक शुभांगी थोरात, देवीदास उईके, नंदा सातपुते, नितीन ठाकरे, शेख वसीम करीत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news