उद्याच्या महामोर्चावरून सरकार-विरोधक आमने-सामने

उद्याच्या महामोर्चावरून सरकार-विरोधक आमने-सामने

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : महापुरुषांचा सत्ताधाऱ्यांकडून सतत सुरू असलेला अपमान, महाराष्ट्राचे गुजरातकडे पळवले जाणारे प्रकल्प आणि कर्नाटक सीमा प्रश्नावर राज्य सरकारने घेतलेली मराठी भाषिक विरोधी भूमिका या मुद्द्यांवर शनिवारी महाविकास आघाडीचा विराट मोर्चा मुंबईत धडकणार असून, त्यावरून सरकार विरुद्ध आघाडी असा संघर्ष उभा ठाकला आहे. या महामोर्चाला गुरुवारी रात्रीपर्यंत पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरील रस्त्यांवर सभापीठ उभारण्यालाही पोलिसांनी विरोध केला आहे. असे असले तरी आम्ही मोर्चा काढणारच व सभाही घेणार असा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी गुरुवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मोर्चाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोर्चाची भूमिका मांडली.

परवानगी द्यायची की नाकारायची हे शासनाने ठरवावे. कोणत्याही एका राजकीय पक्षाचा हा मोर्चा नाही. मोर्चाच्या तयारीसाठी बोलावलेल्या बैठकीला सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित राहिले आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य केली जात आहेत. त्याबद्दलचा असंतोष व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा निघणारच, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपशब्द वापरले गेले, त्याचा चिकार करण्यासाठी, तसेच महागाई, बेरोजगारी याविषयावर हा मोर्चा असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईकर मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी होतील. विविध राजकीय पक्षांचे लोक सहभागी होतील. ज्यांचा राजकीय पक्षांशी संबंध नाही पण महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला गेला म्हणूनही लोक या मोर्चात येतील, असे पवार यांनी सांगितले. मोचात शिस्त राहिली पाहिजे. कोणत्याही प्रकारचा विध्वसंक मोर्चा होणार नाही. अतिशय शांततेत मोर्चा निघेल. आवश्यक सर्व परवानग्या मागितल्या आहेत. अजून परवानगी आमच्या हातात आलेली नाही. पण परवानगी नक्की येईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

विरोधकांना विश्वासात घेऊन राज्यात सीमा प्रश्नावर बैठक बोलावणे गरजेचे होते का या प्रश्नावर उध्दव ठाकरे म्हणाले की, मूळात विरोधी पक्ष हा शब्द थोडासा विचित्र आहे. कोणाचे विरोधक म्हणून नव्हे तर महाराष्ट्र प्रेमी म्हणून आम्ही शनिवारी मोर्चामध्ये उतरत आहोत. महाराष्ट्राचे सरकार महाराष्ट्राची बाजू मांडत नाही आणि विरोधी पक्ष रस्त्यावर उतरत आहे मग विरोधी कोण आणि सत्ताधारी कोण असा सवाल उध्दव ठाकरे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राचे प्रेम जसे आमच्यात आहे तसे सरकारमध्ये आहे का नाही याचे उत्तर कोण देणार, असे ते म्हणाले. सीमा भागातील लोकांनी कर्नाटकमध्ये जाण्याचा संकल्प केला आहे याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता उध्दव ठाकरे म्हणाले की, बेळगाव, कारवार निपाणी या भागातील लोक वर्षानुवर्षे सांगत आहेत की आम्हाला महाराष्ट्रात जायचे आहे त्यावर प्रथम उत्तर शोधा पुस्तक न वाचता पुरस्कार कसा? फ्रैक्चर्ड फ्रिडम पुस्तकाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उदव म्हणाले की, एखादी समिती नेमली जाते तेव्हा त्या समितीचा आदर केला पाहिजे. पुस्तक वाचले नाही किंवा पुरस्कार देण्याच्या आधी ही चर्चा होण्याची गरज होती. पुस्तक नाचता तुम्ही पुरस्कार कसा देतात आणि पुस्तक न वाचता पुरस्कार परत केला येऊ शकतात. मूळात त्या पुस्तकात काय आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे. निर्णय जाहीर होण्यापूर्वी विचारविनिमय व्हायला पाहिजे. निर्णय झाल्यानंतर समितीच्या मताचा आदर राखला पाहिजे अशी अपेक्षा उदव यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news