Latest

जेव्हा राहुल बजाज यांनी प्रश्नांची सरबत्ती करून थेट अमित शहांना खडे बोल सुनावले होते ! (video)

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रख्यात उद्योगपती आणि बजाज उद्योग समुहाचे माजी चेअरमन राहुल बजाज यांचे काल (ता.१२) निधन झाले. त्यांच्या निधनाने सरकारला विविध समस्यांवर धारेवर धरणारा स्पष्टवक्ता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांनी व्यवस्थेला खडे बोल सुनावताना कधीच मागे पाहिले नाही. त्यांच्या नजरेतून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा सुटले नाहीत.

सुप्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज बिनदिक्कत आपले म्हणणे मांडायचे. त्यांच्या स्पष्ट बोलण्याच्या पद्धतीमुळेच ते इतर उद्योगपतींपेक्षा नेहमीच वेगळे ठरले. संपूर्ण उद्योगक्षेत्रातच नव्हे तर मध्यमवर्गाच्या आशा-आकांक्षांना 'पंख' देणारा स्पष्टवक्ता, निर्भीड उद्योगपती म्हणून त्यांची ओळख होती.

त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचा एक किस्साही आहे, जेव्हा त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर कडवट प्रश्न उपस्थित केले. राहुल बजाज मुत्सद्देगिरीत पारंगत होते. नोव्हेंबर २०१९ मध्ये, त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मंत्र्यांच्या गटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ईटी पुरस्कार कार्यक्रमात ते म्हणाले होते की, कोणीही उद्योगपती बोलणार नाही, पण मी स्पष्टपणे सांगेन. यूपीए-2 मध्ये आम्ही कोणावरही टीका करू शकत होतो. तुम्ही चांगले काम करत आहात, पण तरीही आम्ही या क्षणी उघडपणे टीका केल्याबद्दल तुम्ही आमचे कौतुक कराल असा आत्मविश्वास नाही. त्यांच्या चिंतेला उत्तर देताना शहा म्हणाले होते की, घाबरण्याची गरज नाही.

यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन, तत्कालीन रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी, बिर्ला समूहाचे कुमार मंगलम बिर्ला, दूरसंचार कंपनी भारती एअरटेलचे सुनील भारती मित्तल उपस्थित होते.

इतकेच नाही तर २००२ मध्ये गुजरात दंगलीनंतर काही महिन्यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दिल्लीतील एका कार्यक्रमात प्रश्नोत्तराच्या सत्रात त्यांनी थेट विचाले की गुजरात गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित आहे का?

उदारीकरणापूर्वीच्या काळात, 'हमारा बजाज' ही धून एकेकाळी देशातील मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबांच्या महत्त्वाकांक्षेचे वैशिष्ट्य मानली जात होती. ही ट्यून बजाज ऑटोची होती आणि त्यामागे राहुल बजाज होते. परमिट राजच्या काळात दुचाकी आणि तीन चाकी वाहनांचा ब्रँड स्थापन करून त्यांनी आपली क्षमता दाखवून दिली.

राहुल बजाज यांचे काल पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांनी गेल्यावर्षी ३० एप्रिल रोजी बजाज ऑटोचे बिगर कार्यकारी संचालक आणि अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तथापि, ते कंपनीचे अध्यक्ष एमेरिट्स राहिले.

हे ही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT