टोकियो : 'यूएई' (UAE Rover)म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई, अबुधाबीसारखी अनेक शहरे आज जगभर प्रसिद्ध आहेत. तिथे जगातील अनेक देशांमधील पर्यटक येत असतात. आता या अरब राष्ट्राचे अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातही नावलौकिक मिळवण्यास सुरुवात केली आहे. या देशाचे रोव्हर आता जपानच्या साथीने चंद्राच्या दिशेने पाठवण्यात आले आहे.
जपानच्या कंपनीने अमेरिकन अंतराळ कंपनी 'स्पेसएक्स'च्या रॉकेटच्या साहाय्याने आपले 'लँडर' व संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) रोव्हरला (UAE Rover) चंद्राकडे पाठवले आहे. चंद्रासाठी यूएईच नव्हे तर कोणत्याही अरब देशाचा हा पहिला रोव्हर आहे. या मिशनअंतर्गत 'लँडर'ला चंद्रावर पोहोचवण्यात साधारण 5 महिने लागतील.
आतापर्यंत रशिया, अमेरिका आणि चीनचे लँडर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करू शकले आहेत. सर्वात आधी 1966 मध्ये तत्कालीन सोव्हिएत संघाने हे यश मिळवले. 'चांद्रयान-2' मोहिमेदरम्यान भारतालाही लँडरचे चांद्रभूमीवर सॉफ्ट लँडिंग (UAE Rover) घडवून आणण्यास अपयश आले होते.
हेही वाचा :