Google वर ‘सेक्‍स’ शब्‍द Search करण्‍यात यंदा ‘हा’ देश राहिला आघाडीवर

Google वर ‘सेक्‍स’ शब्‍द Search करण्‍यात यंदा ‘हा’ देश राहिला आघाडीवर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : यंदा सेक्‍स हा शब्‍द सर्वाधिक श्रीलंका या देशात सर्च ( Google Search)  करण्‍यात आला आहे, असे  गूगल ट्रेंडसच्‍या ( Google Trends ) माहितीत स्‍पष्‍ट झाले आहे. या वर्षी हा शब्‍द शोधत श्रीलंकाने इथोपियाला पिछाडीवर टाकले आहे. २०१९ आणि २०२० मध्‍ये सेक्‍स शब्‍द सर्च करण्‍यात इथोपिया हा देश जगात पहिला स्‍थानावर होता.

Google Search : दुसर्‍या स्‍थानी व्‍हिएतनाम

गुगल सर्च इंजिन सर्व प्रकारचा कंटेंट सर्च करण्‍यात आपल्‍याला मदत करते. यातूनच गूगल ट्रेंडमध्‍ये काय आहे, याचे उत्तरही आपल्‍याला मिळेत. डेली मिररच्‍या रिपोर्टनुसार, गुगल ट्रेंड ट्रॅकिंगनुसार जगात सर्वाधिक सेक्‍स हा शब्‍द श्रीलंकेच्‍या नागरिकांनी इंटरनेटवर सर्च केला गेला आहे. यामध्‍ये देशातील तामिळ बहुल उत्तर प्रांतात हा शब्‍द शोधला गेला. या प्रांतात देशातील सर्वाधिक तरुण लोकसंख्‍या आहे. सेक्‍स हा शब्‍द सर्च करणार्‍या देशामध्‍ये दुसर्‍या स्‍थानावर व्‍हिएतनाम आहे तर बांगलादेश तिसर्‍या स्‍थानावर आहे.

श्रीलंकाने सेक्‍स शब्‍दाच्‍या सर्चमध्‍ये इथोपिया देशाला पिछाडीवर टाकले आहे. २०१९ आणि २० या वर्षात इथोपिया हा शब्‍द सर्च करण्‍यात पहिल्‍या स्‍थानावर होता. लहान देशात विशिष्‍ट शब्‍दाचा शोध अधिकवेळा केला असता Google Analytics मध्‍ये हा देश वरच्‍या क्रमाकांवर राहतो.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news