‘समृद्धी’वर दहा वर्षे टोलवसुली आमदार, खासदारांनाही लागणार टोल | पुढारी

'समृद्धी'वर दहा वर्षे टोलवसुली आमदार, खासदारांनाही लागणार टोल

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर १० डिसेंबर २०३२ पर्यंत आहे. तब्बल दहा वर्षे टोल आकारला जाणार आहे. कार, जीप, व्हॅन या हलक्या वाहनांना १० डिसेंबर २०२५ पर्यंत प्रति कि.मी. १.७३ रुपये टोल आकारला आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यात वाढ होऊन शेवटच्या दीड वर्षात २.९२ रुपये प्रति कि.मी या. दराने पथकर आकारण्यात येणार आहे.समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी झाले. त्या दिवसापासून रस्ते विकास महामंडळाने टोल आकारणीस सुरुवात केली आहे. ११ डिसेंबर २०२२ ते १० डिसेंबर २०३२ पर्यंत महामार्गावर टोल आकारणी सुरू केली आहे. याबाबतचे राज- पत्रदेखील प्रसिद्ध करण्यात आले आहे

समृद्धी महामार्गावर आमदार व खासदारांच्या वाहनांनाही टोल भरावा लागणार आहे. फक्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, या उपराज्यपाल, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, लोकसभेचे सभापती व राज्यसभेचे अध्यक्ष, विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, उच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, राज्य दौऱ्यावरील परदेशी मान्यवर, लष्कर व पोलिसांची वाहने, अग्निशमन दलाची वाहने व रुग्णवाहिकांनाच टोलमाफी असणार आहे.

पहिल्या बसचे स्वागत

समृद्धी महामार्गावरून धावणारी पहिली प्रवासी बस शिर्डी येथे सोमवारी दाखल झाली. श्री साईबाबा संस्थानच्या वतीने या बसचे स्वागत करण्यात आले.या पहिल्या प्रवासी बसला नागपूर विमानतळ येथून रविवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवाझेंडा दाखवून रवाना करण्यात आले होते. शिर्डीत या बसचे श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे यांनी स्वागत केले. त्यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले. यात्रेचे आयोजक किरण पांडव व त्यांच्या समवेत आलेले ४७ प्रवासी व बस चालकाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या स्वागताने प्रवासी भारावून गेले होते.

Back to top button