Star Back tortoise | मुंबईत दुर्मिळ प्रजातीच्या कासव तस्करीचा पर्दाफाश; साडेतीन लाखांचे स्‍टार बॅक कासव जप्त | पुढारी

Star Back tortoise | मुंबईत दुर्मिळ प्रजातीच्या कासव तस्करीचा पर्दाफाश; साडेतीन लाखांचे स्‍टार बॅक कासव जप्त

ठाणे : पुढारी वृत्‍तसेवा; दुर्मिळ कासावाची तस्करी करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे एमएचबी कॉलनी पोलिसांनी केली. या कारवाईत २० स्टार बॅक प्रजातीचे दुर्मिळ कासव (Star Back tortoise) जप्त करण्यात आले आहेत. या कासवांची किंमत साडेतीन लाख रुपये असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे.

मुंबईत सुरू असलेल्या गैरधंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिल्या आहेत. त्यानुसासर बोरिवलीतील एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्याचे पथक गैरधंदे करणाऱ्यांवर लक्ष ठेवून होते. पोलीस उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे यांना कासवाची तस्करी करणाऱ्यांची माहिती प्राप्त झाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी बोरिवली पश्चिम परिसरातील गणपत पाटील नगरात सापळा लावून नदीम शुजौद्दीन शेख (वय ३३, मीरा रोड, ठाणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे २० कासवे आढळून आली. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. हे कासव कोठून आणले? कोणाल विकणार होता? याचा पोलीस तपास करत आहेत. (Star Back tortoise)

हेही वाचा : 

Back to top button