Urfi Javed 
Latest

Urfi Javed : अरे, हिला तर अर्धे स्वेटर मिळालयं?; उर्फी पुन्हा झाली ट्रोल (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते.  ( Urfi Javed ) तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. कधीकधी तिला तिच्या फॅशनवर असभ्य वर्तन म्हणत कॉमेन्टचा पाऊस पडतो. काही वेळा तिला धमक्याही दिल्या जातात. तिच्‍याकडूनही ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले जाते. याच दरम्यान, उर्फीच्या आणखी एका टॉपलेस व्हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाला असून, यामुळे ती पुन्‍हा एकदा चांगलीच ट्रोल झाली आहे.

उर्फी जावेदने ( Urfi Javed ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर पुन्हा एकदा बोल्ड व्हिडीओ शेअर केला आहे. यात उर्फीचा बोल्ड आणि टॉपलेस अवतार पाहायला मिळतोय. यावेळी उर्फीने ब्लॅक रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला आहे. यातील विशेष म्हणजे, उर्फीने घातलेल्या कपडे अर्धवट असून आर्धी बॉडी तिने कपड्याने आणि आर्धी बॉडी तिने स्वत: च्या हाताने झाकली आहे. यासोबत तिने केसांची स्टाईल, मेकअप आणि कानात ब्लॅक रंगाचे इअररिंग्स परिधान केले आहेत.

या व्हिडिओच्या कॅप्शमध्ये तिने 'जोपर्यंत तुम्ही ट्विटर , इन्स्टाग्राम, फेसबुक विकत घेण्याइतके श्रीमंत होत नाही, तोपर्यंत माझी हे फोटो सहन करा. हा तुमच्यासाठी एक धडा आहे…' असे म्हटले आहे. पंरतु, हा व्हिडिओ चाहत्याच्या पसंतीस अजिबात उतरला नाही. या व्हिडिओवर चाहत्यानी कॉमेन्टचा वर्षाव करत उर्फीला  ट्रोल केले आहे.

उर्फीच्या व्हिडिओला निर्माती नाझ जोशी हिने 'गुड' अशी कॉमेन्टस लिहिली आहे. एका युजर्सने 'Are mere Ghar ka pocha dekha kisene?', 'अरे हिला तर अर्धे स्वेटर मिळालेय?', 'मेरे ड्रेस की एक अस्तीन गयाब हो गई है…किसी को मिले तो बता देना… कृपया', 'हिला असे कपडे परिधान करून काय मिळतेय', 'अरे अर्धे कपडे कशाला परिधान केलेस…', , 'असभ्य वर्तन आहे', 'apki dress kuch unique ? hi hoti h', 'पुर्ण अंगभरून कधीतर कपडे घालत जा', 'अर्धे स्वेटर परिधान केलंय का?', यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचा ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरला आहे. याच दरम्यान काही नेटकऱ्यांनी उर्फीला या व्हिडिओतील लूकवरून जोरदार ट्रोलदेखील केले आहे.  उर्फी जावेद नेहमी सोशल मीडियावर काही हॉट आणि बोल्ड फोटोज शेअर करत असते. या व्हिडिओला आतापर्यत जवळपास २ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. विचित्र फॅशनचे कपडे घालण्यासाठी उर्फी नेहमीच चर्चेत असते.

हेही वाचा :  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT