कार्तिक आर्यनचा चित्रपट ओटीटीवर | पुढारी

कार्तिक आर्यनचा चित्रपट ओटीटीवर

पुढारी ऑनलाईन : कार्तिक आर्यन हा बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता आहे. त्याने याआधी सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे साहजिकच त्याच्या चित्रपटांची प्रेक्षक आवर्जून वाट पाहतात. लॉकडाऊननंतर चित्रपटगृहे फुल्ल दिसत आहेत.

कार्तिकच्या ‘भूल भुलैया 2’ ने अनेक रेकॉर्ड्स मोडले. आता त्याचा आगामी चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होतोय. गेले काही दिवस तो काही सिनेमांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यातील काही चित्रपटांचे शूटिंग त्याने पूर्ण केले असून ते रीलिजसाठी सज्ज आहेत.

कार्तिक काही महिन्यांपूर्वी ‘फ्रेडी’ या चित्रपटावर काम करत होता. त्याचा हा चित्रपट थिएटरमध्ये नाही, तर ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या रीलिजची नुकतीच घोषणाही झाली आहे. निर्मात्यांनी मात्र हा सिनेमा किती तारखेला प्रदर्शित होणार ते अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे.

Back to top button