Uncategorized

नाना पाटेकर ‘कोण होणार करोडपती’च्या हॉटसीटवर

अनुराधा कोरवी

मुंबई : पुढारी ऑनलाईन: 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात पद्मश्री नाना पाटेकर हॉटसीटवर असणार आहेत.

'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातून 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर हे करत आहेत. ते हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीने बोलून त्यांना मानसिक पाठबळ देत आहेत.

अधिक वाचा 

'कोण होणार करोडपती'मध्ये आठवड्यातून एक दिवस 'कर्मवीर विशेष' भाग असतो. पहिल्याच आठवड्यात शनिवारी, १७ जुलैच्या भागात पद्मश्री अभिनेते 'नाना पाटेकर' कर्मवीर म्हणून येणार आहेत.

नाना पाटेकर यांनी मंचावर अनेक आठवणींना उजाळा दिला. कधीही न पाहिलेले नाना प्रेक्षकांना या भागात पाहायला मिळणार आहेत. फार कमी लोकांना माहित असेल, पण नाना पाटेकर यांनी सैनिकी शिक्षण घेतले असून त्यांनी कारगील युद्धात भागदेखील घेतला होता.
नाना पाटेकर यांनी आपले कारगील युद्धातील काही अनुभवही यावेळी सांगितले. नानांच्या वडिलांबद्दल नाना कधी फार व्यक्त होत नाहीत, पण खेडेकरांनी त्या मुद्द्याला हात घालून नानांना बोलते केले.

अधिक वाचा 

नाना पाटेकर झाले भावुक 

आपल्या वडिलांबद्दल बोलताना नाना पाटेकर भावुक झाले. अनेक किस्से, कविता, बालपणीच्या आठवणी, शेतावरच्या गप्पा असे नानांचे अनेक पैलू या मंचावर उलगडले.

कर्मवीरच्या भागामध्ये स्पर्धक येऊन सामाजातील गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. आता नाना नेमकं कोणासाठी खेळणार हे मात्र, अजून गुलदस्त्यात आहे.

नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये नाना सचिन खेडेकरांना आपली पण त्यांच्यासारखा सूट घालायची इच्छा बोलून दाखवताना दिसले. पहिल्या कर्मवीर भागात नाना पाटेकर आले आहेत तर या पर्वात पुढे आणखी कोणते कर्मवीर पाहायला मिळतील याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अधिक वाचा 

घरबसल्या लखपती होण्याची संधी सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. 'कोण होणार करोडपती' टीव्हीवर पाहता-पाहता प्रेक्षक खेळू शकतात 'कोण होणार करोडपती प्ले अलॉंग'! आणि जिंकू शकतात एक लाख रुपये आणि हॉटसीटवर येण्याची संधी.

पाहायला विसरू नका 'कोण होणार करोडपती' – कर्मवीर विशेष, १७ जुलै, शनिवारी रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

हेही वाचलंत का?

पाहा :"ब्रा आणि बुब्ज वर मी बोलले कारण…" | हेमांगी कवी Exclusive

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT