पुढारी ऑनलाइन डेस्क : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून (Ministry of Road Transport and Highways) मोटरसायकल, स्कूटर, कार चालवणाऱ्यांसाठीची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड म्हणून स्वीकारण्यात येणाऱ्या ट्रॅफिक चलनात वाढ केली आहे. तसेच ड्रायव्हिंग लायसन्सदेखील (Driving Licence) जप्त केले जाईल. त्यामुळे या नव्या नियमांचा विचार करता इथूनपुढे गाडी चालवत असताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
वाहन चालक जर नव्या ट्रॅफिक नियमांमध्ये दिलेल्या नियमांपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवताना पकडला गेला तर आता 2000 ते 4000 रूपये इतका दंड आकारला जाणार आहे. याआधीच्या नियमांनुसार त्याला पहिल्या चुकीसाठी 400 रुपये दंड ठोठावला जात होता.
आता या सुधारित नियमांनूसार पहिली चुकीसाठी LMV वाहनांसाठी 1000 ते 2000 रुपये दंड आणि प्रवासी किंवा माल वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी 2000 रुपये ते 4000 रुपये दंडाची तरतूद केली आहे. याशिवाय दुसऱ्यांदा ही चूक करताना वाहन पकडले गेल्यास त्याचा थेट ड्रायव्हिंग लायसन्स जप्त केले जाणार आहे.
या ऑनलाइन प्रक्रियेनंतरही तुम्हाला ड्रायव्हिंग चाचणीसाठी आरटीओ ऑफीसमध्ये जावे लागेल. काही दिवसांनंतर, तुम्ही वेबसाइटवरून लर्निंग लायसन्स ऑनलाइन डाउनलोड करू शकाल. लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्यापासून 30-180 दिवसांच्या आत तुम्ही कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता.
कायमस्वरूपी परवान्यासाठी, तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी जी प्रक्रिया करावी लागली तीच प्रक्रिया पुन्हा यावेळी करावी लागेल. सारथी पोर्टलवर लॉग इन करा, नवीन ड्रायव्हिंग लायसन्सवर क्लिक करा, नवीन पृष्ठ उघडेल, येथे तपशील भरा आणि चाचणीची तारीख निवडा आणि फी जमा करा. त्यानंतर निवडलेल्या तारखेला, तुम्हाला RTO मध्ये जाऊन परमनंट DL ची चाचणी द्यावी लागेल, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याद्वारे दिलेल्या पत्त्यावर येईल.
https://echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जा. चेक चलन स्टेटस हा पर्याय निवडा. तुम्हाला चलन क्रमांक, वाहन क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक (DL) चा पर्याय मिळेल. वाहन क्रमांकाचा पर्याय निवडा. विचारलेली आवश्यक माहिती भरा आणि 'Get Detail' वर क्लिक करा. आता चलन स्थिती दिसेल.
https://echallan.parivahan.gov.in/ वर जा. चलानशी संबंधित आवश्यक तो तपशील व कॅप्चा भरा आणि तपशील मिळवा या ऑप्शनवर क्लिक करा. एक नवीन पृष्ठ उघडेल, ज्यावर चालनाचे तपशील दिले जातील. तुम्हाला भरायचे असलेले चलन शोधा. चलनासोबतच ऑनलाइन पेमेंटचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. पेमेंट संबंधित माहिती भरा. पेमेंट झाल्याची खात्री करा. यानंतर तुमचे ऑनलाइन चलन भरणा हे यशस्विरित्या पूर्ण झाले असेल.
हेही वाचा