Latest

पुणे विभागातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या सोळा अधिकाऱ्यांच्या बदल्या

निलेश पोतदार

पुणे; पुढारी वृत्‍तसेवा : पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदी (आरडीसी) हिम्मत खराडे तर हवेली उपविभागीय अधिकारीपदी (प्रांत) संजय आसवले यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. या दोघांसह पुणे विभागातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या सोळा अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश महसूल आणि वन विभागाचे उपसचिव माधव वीर यांनी काल (शुक्रवार) जारी केले. उपजिल्हाधिकारी दर्जाच्या सोळा अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे…

पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांची नियुक्ती

पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांची नियुक्ती झाली आहे. सध्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांची अंधेरी येथील मुद्रांक जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. आसवले यांची हवेली उपविभागीय अधिकारी या रिक्त पदावर नियुक्ती झाली आहे. सचिन बारावकर यांच्या बदलीने हे पद रिक्त झाले होते.

पंढरपूरच्या उपविभागीय अधिकारी म्हणून गजानन गुरव यांची नियुक्ती झाली आहे. सचिन ढोले यांच्या बदलीमुळे हे पदही रिक्त होते. गजानन गुरव यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केले होते. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या प्रतिनियुक्ती संपुष्टात आणून त्यांची निवासी उपजिल्हाधिकारी, भंडारा येथे बदली करण्यात आली आहे.

कोल्हापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी शंकरराव जाधव

कोल्हापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी शंकरराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अधिकारी बदली तपशील (नाव, सध्याचे पद, नवीन पद या क्रमानुसार) हिम्मत खराडे, नोंदणी उपमहानिरीक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे. संजय आसवले, भूसंपादन अधिकारी, सातारा, उपविभागीय अधिकारी, हवेली.

गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी, सोलापूर, उपविभागीय अधिकारी, पंढरपूर. भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन, पुणे. प्रशांत आवटे, उपविभागीय अधिकारी, जय. उपजिल्हाधिकारी, महसूल, सातारा. किरण मुसळे-कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना, उपजिल्हाधिकारी भूसंपादन, सांगली. शंकरराव जाधव, उपजिल्हाधिकारी, सांगली निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर.

वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सांगली. उपविभागीय अधिकारी, भुदरगड. अप्पासाहेब समिंदर, अन्नधान्य वितरण अधिकारी उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा.

उदयसिंह भोसले, उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा उपजिल्हाधिकारी, भूसंपादन, उस्मानाबाद.जयश्री कटारे, निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे मुद्रांक जिल्हाधिकारी, अंधेरी. विजया यादव, उपजिल्हाधिकारी, सांगली उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी, सातारा. मोहिनी चव्हाण, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, सोलापूर. उपजिल्हाधिकारी महसूल, सांगली. श्रीरंग तांबे, उपविभागीय अधिकारी, पाटण जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोलापूर. सुनील गाढे, भूसंपादन अधिकारी, पुणे, उपविभागीय अधिकारी, पाटण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT