Latest

महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणी तिघे ताब्यात; सीबीआय चौकशीची मागणी

backup backup

प्रयागराज, पुढारी ऑनलाईन: आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यू नंतर आता पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. गिरी यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये मुख्य शिष्य आनंद गिरी यांचेही नाव आहे.

दरम्यान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महंत नरेंद्र गिरी यांचे अंत्यदर्शन घेतले. मठातील संपत्तीवरून वाद आणि बदनामी झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे नरेंद्र गिरी यांनी सुसाइड नोटमध्ये नमूद केले आहे.

दरम्यान शिवसेनेने उत्तरप्रदेश सरकारवर टीका केली असून उत्तरप्रदेशात हिंदुत्वाचा गळा घोटला जात आहे.

नरेंद्र गिरी हे आत्महत्या करणार नाहीत, त्यामुळे त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

सोमवारी खांबावर लटकलेल्या अवस्थेत नरेंद्र मृतदेह आढळला आहे.

घटनास्थळावरुन पोलिसांना ७ पानांची सुसाईड नोट मिळाली असून यात वादग्रस्त शिष्य आनंद गिरी यांचे नाव आहे.

पोलिसांनी शिष्य आनंद गिरी यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

त्यासोबतच, लेटे हनुमान मंदिराचे पुजारी आणि त्यांच्या मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रयागराजच्या जॉर्ज टाऊनमध्ये याप्रकरणी आयपीसी ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

महंत नरेंद्र गिरी यांचा मठामध्येच मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारच्या भोजनानंतर नरेंद्र गिरी हे विश्रांतीसाठी आपल्या खोलीत गेले.

विश्रांतीची वेळ संपून गेल्यानंतरही ते बाहेर आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या खोलीचा दरवाजा तोडला.

त्यावेळी त्यांचा मृतदेह खांबाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

दीर्घकाळ तणावाखाली

महंत नरेंद्र गिरी बऱ्याच दिवसांपासून तणावाखाली होते, अशी माहिती मिळत आहे.

नरेंद्र गिरी यांचे त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्याशी अनेक दिवसांपासून वाद सुरू होता.

त्यांनी आनंद गिरींना मठातून बाहेर काढले होते. पण, आनंद गिरी यांनी माफी मागितल्यानंतर वाद मिटला होता.

पण, गेल्या काही दिवसांपासून दीर्घकाळ वाद सुरू होता.

शिवसेनेची सीबीआय तपासाची मागणी

नरेंद्र गिरी हे मोठे महंत होते, कुंभमेळा असो, अयोध्येचं आंदोलन असो या सगळ्या हिंदुत्वाच्या लढाईत महंतजी पुढे असत.

अनेकदा त्यांची आणि आमची भेट झाली आहे. त्यांचे आशीर्वाद हिंदुत्त्ववादी संघटना म्हणून शिवसेनेला अनेकदा मिळाले आहेत.

ज्या पद्धतीने त्यांच्या मृत्यूचं प्रकरण समोर आलं ते रहस्यमय आहे.

नरेंद्र गिरी महाराजांचा मृत्यू हा रहस्यमय असून या घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करावी.

कारण, ते मजबूत मनाचे होते, ते आत्महत्या करतील असे वाटत नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT