Latest

ज्युनियर एनटीआरच्या ‘आरआरआर’ची अखेर तारीख ठरली

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि अभिनेता राम चरण याच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. ज्युनियर एनटीआर आणि अभिनेता राम चरण याच्या आगामी 'आरआरआर' (RRR) चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली. हा चित्रपट ठरलेल्या दिवशीच म्हणजे, ७ जानेवारी २०२२ रोजी रिलीज होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नुकतेच विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटवर दिग्दर्शक एसएस राजामौली आणि स्वतःचा एक फोटो शेअर करत आरआरआर' (RRR) चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. यात त्यांनी एसएस राजामौली यांचा आगामी 'आरआरआर' (RRR) चित्रपट पुढे ढकलला जाणार नसून ठरलेल्या तारखेला रिलीज होणार असल्याची माहिती दिली आहे.

तसेच त्यांनी 'आरआरआर' प्रदर्शित होण्यास सज्ज झाल्याचे देखील सांगितले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी 'RRR' चित्रपटाची रिलीज डेट पुढे जाणार नाही. हा चित्रपट ७ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. असे लिहिले आहे.

या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, अजय देवगण, समुथिरकणी हे कलाकार दिसणार आहेत.

याआधी 'आरआरआर' चित्रपट १३ ऑक्टोबर २०२१ रोजी रिलीज होणार होता, परंतु, कोरोनाच्या पाश्वभूमीवर निर्मात्यांनी चित्रपटाचे रिलीज डेट पुढे ढकलण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. चित्रपटाच्या रिलीज डेटमुळे चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे. लवकरच हा चित्रपट सिनेमा घरात दस्तक देणार आहे. याशिवाय चाहत्यांनी हा चित्रपट २०२२ च्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक असेल अशी आशा व्यक्त केली आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT