

पुढारी ऑनलाईन
शाहरुख खानचा नवा चित्रपट 'फॅन'मधून बॉलीवूड डेब्यू करणारी अभिनेत्री मेघा गुप्ता हिचे (Megha Gupta) नवे फोटो चर्चेत आहे. मेघा गुप्ता हिने बाथरूममध्ये बाथ घेतानाचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे. (Megha Gupta)
या फोटोंमध्ये ती बाथरूममध्ये शॉवर घेताना दिसतेय. मेघा निळ्या रंगाच्या बिकिनीत आहे. पण, ती पाठमोरी उभारलेली दिसते.
तिने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं- 'थंड पाण्याचे फवारे, थंडी तुमला खोल श्वास घेण्यासाठी प्रेरित करतात. संपूर्ण शरीरात CO2 चं स्तर कमी करतात. त्यामुळे तुम्हाला तुमचे लक्ष केंद्रीत होण्यास मदत मिळते. या प्रकारे थंड पाण्याचे फवारे तुम्हाला संपूर्ण दिवसासाठी तयार करते आणि अधिक इम्यूनिटी बूस्ट करते.'
मेघा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे. तिने नुकताचं बर्फाचे तुकडे ड्रममध्ये घालून फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात. या फोटोंमध्ये मेघा ध्यान मुद्रेत दिसले. अभिनेत्रीने फोटो शेअर करत Session चा इशारा देखील दिला आहे. फोटोंमध्ये मेघा स्टेप वाला टॉप घातलेला दिसतो. यासोबत तिने लाईट मेकअपदेखील केला आहे.
तिने 'कुसुम', 'कुमकम-एक प्यारा सा बंधन' , 'काव्यांजलि', 'सीआयडी', 'मैं तेरी परछाई हूं' यासारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.