

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा
मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 2,510 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने मुंबईत कलम 144 लागू केले आहे. येत्या 7 जानेवारीपर्यंत कलम 144 लागू राहणार आहे. यासोबतच नववर्ष साजरे करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी नवीन वर्ष साजरे करण्यास बंदी असेल. 30 डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत रेस्टॉरंट, हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट आणि क्लबमध्ये कोणतीही पार्टी करता येणार नाही.
दरम्यान, नागरिक कोरोना नियम पाळणार नसतील तर निर्बंध आणावे लागतील, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. "कोरोना रुग्णांच्या संख्येची वाढ होत असल्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे. मुंबई पाॅझिटिव्हीचा रेट ४ टक्क्यांवर आला आहे, ही आकडेवारी धोकादायक आहे. नागरिकांनी परिस्थितीचं गांभीर्य वेळीच ओळखलं नाही, तर परिणाम भोगावे लागतील. नागरिक नियम पाळणार नसतील निर्बंध आणावे लागतील. दोन दिवसांत निर्बंधाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार आहे", अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली होती.