पुढारी ऑनलाईन
बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांवर सोशल मीडियावर वाद होताना दिसतात. आता सारा अली खान आणि अक्षय कुमार यांचा 'अतरंगी रे' बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे. (Boycott Atrangi Re) सोशल मीडियावर लोक याला 'लव्ह जिहाद'ला प्रोत्साहन देणारा चित्रपट म्हणत आहेत. चित्रपटात बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. नुकताच रिलीज झालेला चित्रपट 'अतरंगी रे' वादात अडकलेला दिसतो. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर मागील आठवड्यात रिलीज झालाय. आता सोशल मीडियावर बॉयकॉटची मागणी होत आहे. ट्विटरवर# Boycott Atrangi Re ट्रेंड करू लागले.
'अतरंगी रे' ला २४ डिसेंबर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटामध्ये सारा एक बिहारची मुलगी रिंकूच्या भूमिकेत आहे. तिचे लग्न जबरदस्तीने एका तमिळ मुलगा विशूशी केली जाते. चित्रपटात दाखवण्यात आलंय की, रिंकू एका जादूगारशी प्रेम करते. त्याच्यासाठी ती आपल्या पतीला देखील सोडायला तयार होते. या जादूगाराचे नाव सज्जाद अली आहे. ही भूमिका अक्षय कुमारने साकारली आहे.
काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की, चित्रपटामुळे हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. आपल्या मुलींचं जबरदस्तीने लग्न लावून दिलं जातं, असं चित्रपटात दाखवण्यात आलंय. काही लोक म्हणत आहेत. की, एक हिंदू मुलगी मुस्लिम मुलाच्या प्रेमात असते आणि ती आपल्या पतीला सोडण्यासही तयार असते. या प्रकरे हा चित्रपट 'लव्ह जिहाद'ला प्रोत्साहन देतो.
अक्षय कुमार 'अतरंगी रे' नंतर पृथ्वीराज, बच्चन पांडे, रक्षा बंधन, राम सेतु, आणि 'ओह माय गॉड 2' यासारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. सारा अली खान विक्की कौशलसोबत 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा'मध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.