पौड : पुढारी वृत्तसेवा; मुळशी धरण परिसरातील शिरवली येथील आईनेच स्वतःच्या पोटच्या दोन मुलांचा रस्सीने गळा आवळून खून केला. ही हदरवून टाकणारी घटना बुधवारी ( दि.५) दुपारी घडली. ही घटना गुरूवारी ( दि.६ ) सायंकाळी उघडकीस आली आहे. खून करून जन्मदाती आई पलायन करून घरातून निघून गेली आहे.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरवली येथील कॅप्रीकाँन होम अँन्ड डेव्हल्पर्स लेबरकँम्प येथे संजय जगन्नाथ सोलंकी (वय २५ ) आणि त्यांची पत्नी पुना (वय २४) येथे मजूरी करुन राहत होते. सोलंकी दाम्पत्य मुळचे राहणार-ग्राम मेरीखेडा, तहसील हरसोद, जिल्हा खांडवा, राज्य मध्य प्रदेश येथील आहे. पूना ही चंदा ( वय ३ वर्षे ६ महिने ) व मुलगा आनंद (वय २ वर्षे) त्यांच्या लहान मुलांना सतत मारहाण करायच्या. रागाच्या भरात तिने दोन्ही मुलांचा शिरवली (ता.मुळशी ) येथील कॅप्रीकाॅन होम ॲन्ड डेव्हल्पर्स साईटवर रस्सीने गळा आवळून दोघांचा खून केला आणि मूलांची प्रेतं झाडीत गवतात टाकून निघून गेली आहे. या प्रकरणी संजय जगन्नाथ सोलंकी यांनी फिर्याद दाखल केली आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांनी घटना स्थळाला भेट दिली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ हे करीत आहेत.
हेही वाचा: