कोल्हापूर : खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री निवेदिता माने अत्यंत चुरशीच्या लढतीत विजयी | पुढारी

कोल्हापूर : खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री निवेदिता माने अत्यंत चुरशीच्या लढतीत विजयी

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीच्या दोन्ही महिलांनी बाजी मारली आहे. माजी खासदार निवेदिता माने आणि श्रुतिका काटकर यांचा विजय झाला आहे. अत्यंत चुरशीच्या लढतीत महिला आघाडीतून सत्ताधारी पॅनलचा विजय झाला आहे.
खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री निवेदिता माने यांनी बंडखोरी केल्याचा आरोप शिवसेनेतून करण्यात आला होता. त्यामुळे या निवडणुकीमध्ये निवेदिता माने निवडून येतील का अशी चर्चा जोरदार सुरू होती.

निवेदिता माने यांनी सत्तारुढ गटाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवसेनेला सोडून माजी खा. निवेदिता माने सत्ताधार्‍यांसोबत राहिल्या होत्या.

तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनुसूचित जाती गटामधून हातकणंगले तालुक्याचे आमदार राजू आवळे निवडून आले आहेत. ते सत्ताधारी गटाकडून उमेदवार होते. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे उत्तम कांबळे विरोधी उमेदवार होते.

शिरोळमधून मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर विजयी झाले आहेत. ‘दत्त’चे चेअरमन गणपतराव पाटील यांना ५१ मते, तर यड्रावकर यांनी ९८ मते मिळाली आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : …जेव्हा सिंधुताई उद्धव ठाकरेंना फोन करतात. | Call Recording

Back to top button