Latest

Heena Khan : पिंक ड्रेसमध्ये फिगर फ्लॉन्ट केली अन्‌…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : टीव्ही अभिनेत्री हिना खान ( Heena Khan ) नेहमी आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करून सक्रिय असते. सध्या हिना पिंक रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमधील फोटोमुळे चर्चेत आली आहे. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहे.

हिना खानने (Heena Khan) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर फिकट पिंक रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमधील काही हटके फोटो शेअर केले आहेत. या फोटोत हिना खास करून आपली फिगर फ्लॉन्ट करताना दिसली आहे. या ड्रेसवर पांढऱ्या रंगाच्या धाग्यानी भरतकाम केले असून ड्रेस हिनाच्या सौदर्यांत भर घालत आहे. यासोबत हिनाने मॅचिंग हाय हिल्स, डायमंड फिंगर रिंगसह पिंक शेड मेकअप करून आपला लुक पुर्ण केला आहे. या ड्रेसमध्ये हिना खूपच आकर्षक आणि ग्लॅमरस दिसत आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'I decide my Vibe..' असे लिहिले आहे. शेअर झालेल्या एका फोटोत हिना आपल्या दोन्ही पाय जमिनीवर ठेकून पोझ देताना दिसत आहे. तर तिने यावेळी आपला एक हात जमिनीवर तर दुसरा हात कमरेवर ठेवत हटके पोझ दिली आहे. तर हिनाने आणखी काही फोटोत खाली बसून पोझ देताना दिसली आहे. या फोटोत हिना फिगर फ्लॉंट करत असून पहिल्यापैक्षा खूपच हॉट दिसत आहे. हिनाच्या या फोटोंना २ लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांसोबत बॉलिवूड स्टार्संनी भरभरून कौतुक केले आहे. यात बॉलिवूड अभिनेत्री आर्या अग्रवालने 'Prettiest ???'. तर अभिनेत्री कनिका माहेश्वरीने 'Stunner '.असे लिहिले आहे. यासोबतच एका युजर्सने
'तुम हुस्न परी तुम जाने जहां.. तुम सबसे हसीन तुम सबसे जावा❤️❤️', 'ये कौनसा स्टाइल है ??'. तर दुसऱ्या एका युजर्सने 'मला हा लूक आवडला?? सुंदर दिसणारी मिस खान', 'खूपच सुंदर दिसत आहे ️❤️❤️'असे म्हटले आहे. याशिवाय काही चाहत्यांनी हिनाच्या फोटोवर हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.

याआधी हिना खानने सुट्यांचा आनंद घेत असताना काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोत हिना निळ्या रंगाच्या डेमिनमध्ये वाळवंटात दिसली होती. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले होते.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT