Ricky Kej : ग्रॅमी ॲवॉर्ड विजेते रिकी केजचं पंतप्रधान मोदींनी केले कौतुक | पुढारी

Ricky Kej : ग्रॅमी ॲवॉर्ड विजेते रिकी केजचं पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

पुढारी ऑनलाईन डेस्क

ग्रॅमी ॲवॉर्ड विजेते रिकी केजने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी मोदींनी रिकीचे तोंडभरून कौतुक केले. त्याला मिळालेल्या दुसऱ्या ग्रॅमी विजयाबद्दल मोदींनी त्यांचे अभिनंदन केले. एका ट्विटमध्ये पीएम मोदी म्हणाले की, “संगीताची तुमची आवड आणि उत्साह अधिक दृढ होत आहे.” “७ वर्षांपूर्वी जेव्हा मी माझा पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला तेव्हा तुम्ही मला पर्यावरणीय जाणीवेच्या मार्गावर आणले,” असे केजने ट्विटमध्ये म्हटले आहे. ते पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनाच्या ट्विटला उत्तर देत होते.

रिकीने ४ एप्रिल रोजी त्याच्या डिव्हाईन टाइड्स अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बमसाठी दुसरा ग्रॅमी जिंकला. त्याने १०१५ मध्ये त्याच्या विंड्स ऑफ संसार या अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बम श्रेणीमध्ये पहिला ग्रॅमी जिंकला होता.

 

Back to top button